नवी दिल्ली : देशात कोरोनाने (Corona) हाहाकार माजवला आहे. रोज वाढणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही (Parliament Budget Session) वाढत्या कोरोनाचे सावट आहे. त्या पाश्वर्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू (Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu )आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla ) यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम व्यंकय्या नायडू आणि ओम बिर्ला यांनी वाढत्या कोरोनाच्या पाश्वर्वभूमीवर मागच्या अधिवेशनावेळी लावण्यात आलेल्या नियमावलींचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही सभागृहातील महासचिवांनी लवकरात लवकर यावर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे.
संसद भवनातील 400 हून अधिक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग
दरम्यान, दोन्ही संसद भवनातील 400 हून अधिक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची आकडेवारी काल समोर आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
दिल्लीत कोरोनाचा धुमाकूळ
दिल्लीत कोविड संसर्गाचा दर 19.60 टक्क्यांवर गेला आहे. दिल्ली आरोग्य विभागाच्या मते, गेल्या वर्षी 9 मे रोजी शहरांतील पॉझिटिव्हीटी दर 21.66 टक्के नोंदवला गेला होता. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 48,178 वर पोहोचली आहे. जी 18 मेनंतरची सर्वाधिक संख्या आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये गेल्या वर्षी 18 मे रोजी सर्वाधिक 50,163 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या