Malvika Sood Joins Congress : अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवतोज सिंह यांनी मालविका सूद यांच्या घरी जाऊन त्यांना काँग्रेसचे सदस्यत्व दिले. यावेळी सोनू सूदही उपस्थित होता. 


पंजाबमध्ये पुढील महिन्यात 14 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मालविका सूद पंजाबमधील मोगामधून निवडणूक लढवणार आहे. याआधी सोनू सूद म्हणाला होता, "सर्व पक्षांकडून ऑफर आहेत, परंतु एका आठवड्यात आम्ही पक्षाची निवड करू". गेल्या वेळी ही जागा काँग्रेसच्या हरजोत कमल यांनी जिंकली होती, मात्र मालविका आल्याने त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले.






मालविका सूद कोण आहे?
38 वर्षीय मालविका सूद ही अभिनेता सोनू सूदची सर्वांत लहान बहीण आहे. त्यांची मोठी बहीण मोनिका शर्मा अमेरिकेत राहते. संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली मालविका मोगा येथे इंग्रजी कोचिंग सेंटर चालवते. यासोबतच त्यांनी मोगा येथे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे.


मालविकाचे वडील शक्ती सागर सूद यांचे 2016 मध्ये आणि आई सरोजबाला सूद यांचे 2007 मध्ये निधन झाले. आई-वडिलांच्या स्मरणार्थ भावंडांनी सूद चॅरिटी फाउंडेशनची स्थापना केली. सोनूच्या वडिलांचे मोगा येथे बॉम्बे क्लॉथ हाऊस नावाचे कपड्यांचे दुकान होते. तसेच आई सरोजबाला सूद डीएम कॉलेज, मोगा येथे इंग्रजी शिकवायच्या.


संबंधित बातम्या


Malvika Sood : अभिनेता Sonu Sood ची बहीण मालविका उद्या करणार काँग्रेसमध्ये प्रवेश


Bank Holiday January 2021: जानेवारी महिन्यात बँका 'या' दिवशी बंद राहतील


Rahul Gandhi : द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha