एक्स्प्लोर

विनाअनुदानित गॅस सिलेंडर 86 रुपयांनी महागला!

नवी दिल्ली : विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर 86 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता विनाअनुदानित गॅस सिलेंडर 737.50 रुपयांना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सिलेंडरचे दर वधारल्याने भारतातही किंमतीत वाढ करण्यात आल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. ज्या ग्राहकांनी गॅस अनुदान सोडलं आहे किंवा ज्या ग्राहकांचा वर्षभरातील 12 अनुदानित सिलेंडरचा कोटा पूर्ण झाला आहे, त्यांना विनाअनुदानित गॅस सिलेंडर 737.50 रुपयांमध्ये खरेदी करावा लागणार आहे. सप्टेंबर 2016 पासून एलपीजी सिलेंडर 271 रुपयांनी महाग विनाअनुदानित गॅस सिलेंडरची दरवाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. याआधी 1 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरचे दर 66.50 रुपयांनी वधारले होते. विनाअनुदानित 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरचे दर कालपर्यंत 650.50 रुपये होते. तर सप्टेंबर 2016 मध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 466.50 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या दरात सहा वेळा वाढ करण्यात आली आहे. सप्टेंबर 2016 नंतर आतापर्यंत एलपीजी सिलेंडर 58% म्हणजेच 271 रुपयांनी महागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थाचे दर ऑक्टोबर 2016 पासून वाढत आहेत. अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात किरकोळ वाढ तेल कंपन्यांनी अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही 13 पैशांची किरकोळ वाढ केली आहे. त्यामुळे त्याचे दर आता 434.93 रुपये झाले आहेत. याआधी 1 फेब्रुवारीमध्ये अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 9 पैशांची वाढ करण्यात आली होती. दोन किरकोळ वाढीच्या आधी अनुदानित गॅस सिलेंडरचे दर 8 वेळा वाढले असून, प्रत्येक वेळी किमान 2 रुपयांची वाढ झाली आहे. विमान इंधनाचे दरही वधारले यासोबतच तेल कंपन्यांनी विमान इंधनाचे दरही 214 रुपये प्रति किलोलिटर वाढवल्याने, त्याचा दर 54,293.38 रुपये झाला आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी विमान इंधनाच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Embed widget