एक्स्प्लोर

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत पास, आज राज्यसभेत परीक्षा

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता.

नवी दिल्ली : सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज ते राज्यसभेत मांडलं जाणार आहे. यासाठी राज्यसभेच्या अधिवेशनाचा कालावधीही एक दिवसांनी वाढवला आहे. राज्यसभेत पुरेसं संख्याबळ नसल्याने विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी भाजपची कसोटी लागणार आहे. राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल. यानंतर सरकारी शिक्षण संस्थांसह खासगी कॉलेजांमध्येही आरक्षण मिळू शकेल. सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक सरकारने मंगळवारी (8 जानेवारी) लोकसभेत मांडलं आणि ते सहजरित्या मंजूरही झालं. सभागृहात उपस्थित 326 खासदारांपैकी 323 जणांनी समर्थनार्थ मत दिलं, तर तीन खासदारांनी विरोधात मतदान केलं. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. हे विधेयक घाईगडबडीत आणल्याचं काँग्रेससह काही पक्षांनी म्हटलं, पण आगामी लोकसभा निवडणूक पाहता, कोणीही त्याचा विरोध केला नाही. हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी काँग्रेसने केली. तर विधेयकाबाबत उपस्थित झालेल्या शंकांना उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, हे विधेयक कोर्टातही टिकेल. आतापर्यंतच्या सरकारांनी अधिसूचना किंवा सामन्य कायद्याने आरक्षण वाढवलं होतं, त्यामुळे कोर्टाने ते रद्द केलं होतं. पण यंदा घटनादुरुस्ती करुन आरक्षण दिलं जात आहे. त्यामुळे ते कोर्टातही टिकेल, असं जेटली यांनी सांगितलं. सवर्ण दुर्बलांना 10 टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानंतर काल (8 जानेवारी) हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं. संध्याकाळी पाच वाजल्यापासून विधेयकावर चर्चा सुरु होती, त्यानंतर विधेयक बहुमताने लोकसभेत मंजूर झालं. या आरक्षणासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या 49 टक्के आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात येणार आहे. परिणामी आरक्षणाचा कोटा 49 टक्क्यांवरुन 59 टक्क्यांवर पोहचणार आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला फायदा होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. LIVE UPDATE : आर्थिक मागास सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर कोणकोणत्या समाजाला फायदा? आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लीम किंवा राज्याबाहेर पटेल, जाट, गुर्जर समाजाकडून आरक्षणासाठी मागणी होत आहे. या सर्वांची एकत्रित डोकेदुखी कमी करण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. ब्राह्मण, ठाकूर, भूमिहार, कायस्थ, बनिया, जाट, गुजर समाजाला या आरक्षणाचा फायदा होणार आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये हे आरक्षण मिळणार आहे. मोदी सरकारने 2018 मध्ये एससी/एसटी कायद्यात ज्याप्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला होता, त्यामुळे सवर्णांमध्ये नाराजी होती.

महत्त्वाच्या बातम्या

Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Embed widget