एक्स्प्लोर

सोळाव्या लोकसभेचा शेवटचा दिवस, शेवटच्या भाषणात मोदींच्या कोपरखळ्या

सोळाव्या लोकसभेतील आपले शेवटचं भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षांचा लेखाजोखा मांडताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर कोपरखळ्यांचा पाऊस पाडला. दरम्यान, सोळाव्या लोकसभेच्या निरोपाचा दिवशीही लालकृष्ण अडवाणींना बोलायची संधी मिळाली नाही.

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा अर्थात सोळाव्या लोकसभेचा आजचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी संसदेत बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. यावेळी सोळाव्या लोकसभेतील आपले शेवटचं भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षांचा लेखाजोखा मांडताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर कोपरखळ्यांचा पाऊस पाडला. दरम्यान, सोळाव्या लोकसभेच्या निरोपाचा दिवशीही लालकृष्ण अडवाणींना बोलायची संधी मिळाली नाही. गळाभेट आणि गळ्यात पडणं यातला नेमका फरक पहिल्यांदा कळला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा गळाभेटीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लगावला.  सभागृहात पहिल्यांदाच आपण अनेक गोष्टी अनुभवल्या सांगत गळाभेट आणि गळ्यात पडणं यातला फरक पहिल्यांदाच कळला असा टोमणा राहुल गांधींचं नाव न घेता मारला. पाच वर्षात कोणताही राजकीय भूकंप आला नाही असंही पुढे ते म्हणाले. आम्ही ऐकत होतो की भूकंप येणार, पण कोणताही भूकंप आला नाही. कधी विमानं उडवण्यात आली. पण आपल्या लोकशाहीची उंची इतकी मोठी आहे की कोणतंही विमान त्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही, असंही  मोदी यावेळी म्हणाले. राहुल गांधींनी घेतलेल्या गळाभेटीवर बोलताना ते म्हणाले की, मी पहिल्यांदा येथे आलो तेव्हा अनेक गोष्टी नव्याने कळल्या. पहिल्यांदा मला गळाभेट आणि गळ्यात पडणं यामधील फरक कळला. पहिल्यांदाच पाहिलं की सभागृहात अनेकांची आँखो की गुस्ताखिया सुरु आहेत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खर्गे यांचं कौतुकही केलं. लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी पेलली असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाने सोळाव्या लोकसभेतील अखेरच्या अधिवेशनाची सांगता झाली.

महत्त्वाच्या बातम्या

'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget