Coronavirus Cases Today in India : देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील केले जात आहेत. गेल्या 24 तासात देशात 22 हजार 270 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, कालच्यापेक्षा आज कोरोन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. काल देशात 25 हजार 920 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात देशात 66 हजार 298 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.


सक्रिय रुग्णांची संख्येत घट


सक्रिय रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही  2 लाख 53 हजार 739 इतकी आहे. दरम्यान, आत्तापर्यंत कोरोनामुळे  5 लाख 11 हजार 230 जणांचा मृत्यू झाला आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 4 कोटी 20 लाख 37 हजार 536 रुग्ण कोरोनामतून मुक्त झाले आहेत.


 





दिल्लीत कोरोनाचे 607 नवीन रुग्ण आढळले 


शुक्रवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 607 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुले दिल्लीत आत्तापर्यंत एकूण संक्रमित लोकांची संख्या ही 18 लाख 54 हजार 774 वर पोहोचली आहे. याशिवाय काल चार रुग्णांचा मृत्यू आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मृतांचा आकडा हा 26 हजार 95 वर गेला आहे. राजधानीच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. सध्या दिल्लीतील सक्रिय रुग्णांचा दर हा 1.2 टक्क्यांवर गेला आहे. 


सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी लसीकरण केलेले नाही, अशांना लसीकरण करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. देशात आत्तापर्यंत 175 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहे. काल दिलसभरात 36 लाख 28 हजार 578 लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत 175 कोटी 3 लाख 86 हजार 834 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: