Shiv Jayanti 2022: आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. शिवरायांच्या जयघोषानं आज वातावरण प्रसन्न झालं आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच यावर्षी नियम शिथिल केल्यामुळे शिवप्रेमी जल्लोषात जयंती साजरी करत आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात शिवजयंती साजरी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे. ही एक शैक्षणिक संस्था आहे पण तिथंही शिवजंयतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 


आशियातलं सर्वात मोठं विद्यापीठ म्हणून बनारस हिंदू विद्यापीठाची ओळख आहे. या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बनारस हिंदू विद्यापीठ हे वाराणसीमध्ये आहे. या विद्यापाठीत यावर्षीचा शिवजन्मोत्सव मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. बनारस विद्यापीठातील सर्व मराठी विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी या उत्साहात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मध्वजाचे रक्षक, कुशल राज्यकर्ते, मुघलांचा कडवा प्रतिकार करणारे महान योद्धा, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! असे ट्वीट करत योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांना अभिवादन केले आहे. राष्ट्र आणि धर्मासाठी आपले असलेले समर्पण आणि विरता आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.


 




स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यामुळे यंदाची ही महाराजांची 392 वी शिवजयंती असणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रभाव असल्याने शिवजयंती निर्बंधाखाली होती. पण यंदा रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात असल्याने शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे सर्व शिवभक्तांमध्ये यंदा उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, आज  शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येणार आहेत. त्यासाठी या शिवप्रमेमी सज्ज झाले आहेत. 


दरम्यान, आज महाराष्ट्रातही शिवजयंतीचा मोठा उत्साह यंदा पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवजंयती यंदा उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय शिवभक्तांनी घेतला आहे. तसेच यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: