Lalu Prasad Yadav: आरजेडी नेते लालूप्रसाद यादव उपचारासाठी पाटणाहून दिल्लीला पोहोचले आहेत. रात्री दहाच्या सुमारास ते एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला पोहोचले. यापूर्वी लालू यांचे पुत्र आणि बिहार विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे दिल्लीला पोहोचले होते. लालू यादव यांच्यावर यापूर्वी पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना तिथे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.


याच दरम्यान बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी, तेज प्रताप यादव, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि लालू यांची मुलगी मीसा भारती यांच्याशीही चर्चा केली. लालू यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सांगितले की, लालू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आता त्यांच्यावर दिल्लीत उपचार केले जातील. ते म्हणाले की, तुम्हाला आधीच माहित आहे की, त्यांना उपचारासाठी (किडनी प्रत्यारोपण) सिंगापूर घेऊन जाणार होते. पण आता त्यांना फ्रॅक्चर झाले आहे आणि इतर आरोग्यविषयक समस्यांवरही उपचार सुरू आहेत. दिल्लीतील डॉक्टरांचे मत जाणून घेतल्यानंतर आम्ही त्यांना उपचासाठी परदेशात घेऊन जाण्याचा विचार करत आहोत. लालू यांच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.


दरम्यान, रविवारी लालू प्रसाद दुमजली निवासस्थानाच्या पायऱ्यांवरून खाली उतरत होते. यादरम्यान तोल गेल्याने त्याचा पाय घसरला, त्यामुळे ते पडले. घटनेनंतर लगेचच नातेवाइकांनी त्यांना पाटणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात त्याच्या खांद्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना दिल्लीत उपचारासाठी नेण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Who is Bhagwant Mann Wife : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या होणाऱ्या पत्नी आहेत डॉक्टर, जाणून घ्या कोण आहेत डॉ. गुरप्रीत कौर?
GST Council : अन्नधान्य आणि डेअरी उत्पादनं महागणार, 18 जुलैपासून पाच टक्के जीएसटी लागणार
नकवी यांच्या राजीनाम्यानंतर स्मृती इराणींकडे अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी, तर शिंदे यांच्याकडे पोलाद मंत्रालय