Gurpreet Kaur Biography: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे.  हा विवाहसोहळा खाजगी असून काही मोजकीच लोक उपस्थित राहणार आहेत. या विवाहसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह असणार आहे.  डॉ. गुरूप्रीत कौर यांच्याशी ते विवाहबंधनात अडकणार आहे. गुरूप्रीत आणि भगवंत मान यांची जुनी ओळख आहे


डॉ. गुरप्रीत कौर या 32 वर्षाच्या आहेत. गुरूप्रीत कौर यांचे कुटुंब कुरूक्षेत्र येथील पिहोवाच्या तिलक नगरच्या आहे. गुरूप्रीत कौर यांचे वडिल इंद्रजीत सिंह हे शेतकरी आहे. मदनपूर गावचे ते माजी सरपंच देखील होती. गुरूप्रीत कौर यांची आई गृहिणी आहे. गुरूप्रीत कौर यांन दोन बहिणी आहेत.


गुरूप्रीत तीन बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. त्यांची एक बहिण ऑस्ट्रेलिया येथे तर दुसरी बहिण अमेरिकेत राहते. गुरूप्रीत कौर यांनी अंबाना मौलाना मेडिकल महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. भगवंत मान आणि गुरूप्रीत कौर हो दोन्ही फॅमिली फ्रेंड आहेत.  डॉ. गुरप्रीत कौर या शीख कुटुंबातील आहे. गुरूप्रीत कौर यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आई आणि बहिणीने पसंत केले आहे. 


भगवंत मान यांची पहिली पत्नी कोण आहे?


भगवंत मान यांची इंद्रप्रीत कौर या दोन मुलांसह अमेरिकेत राहत आहे. मान यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.भगवंत मान यांचा 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.  2015 साल हे भगवंत मान यांच्या आयुष्यात कौटुंबीक कलह वाढवणारं ठरलं. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षानं त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करत निवडणूक लढवली होती. राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाले. 48 वर्षीय भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री आहेत.