Shigella News : केरळमधील कासारगोड येथे शोरमा खाल्लाने एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर, 58 विद्यार्थी आजारी पडले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. शिगेला नावाच्या धोकादायक विषाणूची अन्नातून विषबाधा झाली, अशी प्राथमिक माहिती मंगळवारी कासारगोडचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.व्ही. रामदास यांनी दिली आहे. 


शवविच्छेदन अहवालात या विषाणूमुळे देवनंदा नावाच्या 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या हृदय आणि मेंदूला बॅक्टेरियाची लागण झाली होती. शुक्रवारी शोरमा खाणाऱ्या देवानंद या मुलीचा रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवनंदाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आयडियल कूल बार आणि फूड पॉईंट सील केले आहेत. आणि घटनेच्या संदर्भात संदेश राय आणि अॅनेक्स एम. यांना अटक केली आहे. अहमद असे या स्नेक बारच्या मालकाचे नाव असून तो सध्या फरार आहे. 


हे लक्षात घेण्याजोगे आहे की, हा विषाणू 2019 मध्ये केरळमधील कोयलंडी येथे देखील सापडला होता. या ठिकाणी बेस्ट लोअर प्रायमरी स्कूल कीझापायुरच्या 40 मुलांना समान लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


शिगेला विषाणूची लक्षणं आणि उपाय : 



  • शिगेला विषाणूची मुख्य लक्षणे म्हणजे ताप, पोटात जळजळ होणे. सलग सात दिवस हा त्रास होतो. 

  • शिगेला विषाणूचा मुख्य स्त्रोत म्हणजे दूषित अन्न आणि पाणी.   

  • या विष्ठेच्या चाचणीनंतर विषाणूची तपासणी केली जाते. 

  • स्वच्छता राखून त्याचा संसर्ग टाळता येतो. 

  • सर्व वयोगटातील लोकांना या विषाणूची लागण होऊ शकते. 


महत्वाच्या बातम्या :