Akhilesh Yadav on PM Modi : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी इंटरनेटच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात इंटनेट सेवा स्वस्त असल्याचे म्हटले होते. तसेच कनेक्टिव्हिटी खूप वेगवान असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याची अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, तांदूळ, तेल हे स्वस्त करा, केवळ डेटाने पोट भरत नसल्याचे यादव यांनी म्हटले आहे. 'जब हैं भूखे पेट, तो क्या करेगा नेट' असा सवाल अखिलेश यांनी केला आहे.

  
अखिलेश यादव यांनी स्वस्त इंटरनेट डेटा देण्याच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. सामान्य लोकांच्या गरजा केवळ इंटरनेट डेटाने पूर्ण होऊ शकत नाहीत. इंटरनेट डेटाने पोट भरत नाही. देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींकडे लक्ष वेधताना अखिलेश यादव म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि तांदळाचे पीठ या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी केल्या पाहिजेत असे अखिलेश यादव म्हणाले. 


 




भूक लागल्यावर काय करणार : अखिलेश यादव


समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, तांदूळ, तेल, पीठ स्वत व्हायला हवे, कारण इंटरनेट डेटाने पोट भरत नाही. असे अखिलेस यादव यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. जेव्हा भुक लागते त्यावेळी नेट काय करणार? असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. 


काय म्हणाले होत पंतप्रधान नरेंद्र मोदी?


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बर्लिनच्या दौऱ्यावर आहेत. बर्लिनमध्ये भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी दावा केला की, भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप वेगवान आहे. तसेच स्वस्त दरात इंटनेट सेवा दिली जात असल्याचे मोदी म्हणाले होते. तसेच भारत आता वेगाने प्रगती करत आहे. आता देश बदलला आहे. जिथे जाल तिथे काम चालू आहे. बर्लिनमधील भाषणादरम्यान मोठ्या संख्येने भारतीय त्याठिकाणी जमा झाले होते. यावेळी लोकांनी 'भारत माता की जय' आणि 'मोदी है तो मुमकिन है'च्या घोषणाही दिल्या.