Kerala Bus Accident : केरळच्या (Kerala News) पलक्कड जिल्ह्यात दोन बसची धडक (School Bus Accident) झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 38 जण जखमी झाले आहेत. पलक्कड (Palakkad District) जिल्ह्यातील वडक्केनचेरी (Wadakkanchery) येथे हा अपघात झाला. राज्यमंत्री एमबी ब्रजेश यांनी या प्रकरणी सांगितले की, केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Kerala State Road Transport Corporation) बसची पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे एका पर्यटक बसला टक्कर झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले.


येथील वडक्कनचेरीजवळील मंगलम येथे बुधवारी रात्री शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बसनं KSRTC बसला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर बस दलदलीमध्ये कोसळली. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. सुमारे 38 जखमींना विविध रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.






दरम्यान, बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास केरळमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 544 (NH-544) वर हा अपघात झाला. एर्नाकुलम येथील बॅसिलिओस विद्यानिकेतन वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन एक बस उटीच्या दिशेनं निघाली होती. KSRTC सुपरफास्ट बस कोट्टारक्कराहून कोईम्बतूरला जात होती. या दोन्ही बस एकमेकांवर आदळल्यानं हा अपघात झाला. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :