Petrol Diesel Price Today 6th October 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी आज (गुरुवार), 6 ऑक्टोबर 2022 रोजी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दरांमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 


आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीत आज (गुरुवार) पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर इतका आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर झाला आहे. तसेच, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तर, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.


राज्यात परभणीत विकलं जातंय सर्वात महाग पेट्रोल-डिझेल 


महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीत सध्याचा पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे.


दररोज अपडेट होतात पेट्रोल-डिझेलचे दर 


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. मात्र, तेल कंपन्यांनी बराच काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल केलेला नाही.