Cheetah Helicopter Crash: अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर 'चित्ता'चा अपघात झाला आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमकं कारण समजू शकले नाही. 


 






 


स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला. चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून टेहळणीसाठी या भागात येत होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. 


लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या एका वैमानिकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  तर, दुसऱ्या पायलटवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पायलट लेफ्टिनंट कर्नल सौरभ यादव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या अपघाताचे कारण समजले नाही. याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत अपघाताचे कारण समोर येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


'चित्ता' हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या ताफ्यात 1976 मध्ये दाखल झाले होते. हे 'चित्ता' हेलिकॉप्टर प्रवास, निरीक्षण, पाळत ठेवणे, लॉजिस्टिक, मदत आणि बचाव कार्यासाठी होतो. उंचावरील मोहिमेसाठी हे 'चित्ता' हेलिकॉप्टर उपयोगी आहे. चित्ता हेलिकॉप्टरमध्ये  Artouste - III B turbo shaft इंजिन आहे. हिंदुस्तान एअरोनॉक्स लिमिटेडने ( Hindustan Aeronautics Limited) याची निर्मिती केली आहे. HAL ने जवळपास 250 हून चित्ता हेलिकॉप्टरची निर्मिती आणि विक्री केली आहे. भारताबाहेर परदेशातही या हेलिकॉप्टरचा वापर होतो. या विमानात दोन पायलट आणि तीन प्रवासी बसू शकतात. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: