Rice and wheat prices : सध्या सणासुदींचे दिवस सुरु आहेत. या काळात गहू (wheat) आणि तांदळाच्या (Rice) किंमती वेगवेगळ्या दिशेनं जात असल्याचे चित्र दिसत आहे. गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे तांदळाच्या किंमती कमी होताना दिसत आहे. सणासुदीच्या हंगामात गव्हाच्या किंमती 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर तांदळाच्या किंमती या 12 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर गैर-बासमतीच्या किंमती 5 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. 


गव्हाचे दर  2 हजार 525 ते 2 हजार 550 प्रति क्विंटलवर


गव्हाच्या आणि तांदळ्याच्या किंमतीतबाबत रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (Roller Flour Millers Federation of India) अध्यक्षा अंजनी अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, नवीन पीक येईपर्यंत गव्हाच्या किंमती स्थिर राहतील. तर दुसरीकडं बाजारात बासमती तांदळाची मोठी आवक झाल्यामुळं दरांमध्ये घसरण झाली आहे. दरम्यान, एका महिन्यापूर्वी गव्हाचे दर  2 हजार 400 प्रति क्विंटल होते. परंतू सध्या गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये आता गव्हाचे दर हे 2 हजार 525 ते 2 हजार 550 प्रति क्विंटल झाले आहेत. तर नवीन बासमती पिकाची आवक बाजारात सुरु झाल्यानं तांदळाच्या सुगंधी जातीचे भाव उतरु लागल्याची माहिती तांदूळ विपणन आणि निर्यात करणारी कंपनी राईस व्हिलाचे सीईओ सूरज अग्रवाल यांनी दिली. सरकारने 9 सप्टेंबरपासून काही ग्रेडच्या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क जाहीर केल्यानंतर बिगर बासमती तांदळाच्या किंमतीत घसरण झाली आहे. 


तांदळाच्या उत्पादनात घट


बासमती नसलेल्या तांदळावर सरकार संपूर्ण निर्यात बंदी घालू शकते, अशी बाजारात भीती आहे. अधिक पुरवठा अपेक्षित असल्यानं किंमती 3 ते 5 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत असल्याची माहिती सूरज अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, कृषी मंत्रालयानं 2022-23 साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये चालू हंगामात 104.99 दशलक्ष टन (एमटी) खरीप तांदळाच्या उत्पादनाचा अंदाज आहे. तो मागील वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या हंगामात 111.76 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन झाले होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत वितरणासाठी तांदूळाची गरज लक्षात घेता खरीप तांदूळ उत्पादनात झालेली घट लक्षणीय आहे.


महत्त्वाच्या बातम्या: