एक्स्प्लोर
केरळात पावसाचा हाहाःकार सुरुच, एकाच दिवसात 25 मृत्यू
पूरस्थितीमुळे नऊ ऑगस्टपासून 67 जणांचा मृत्यू झाला आहे, तर यातील 25 मृत्यू आजच्या एकाच दिवसात झाले आहेत. तर दुसरीकडे कोचीन विमानतळात पाणी भरल्यामुळे सेवा रद्द करण्यात आली आहे.
तिरुवअनंतपुरम : केरळला पावसापासून अजून कोणताही दिलासा मिळालेला नाही. पूरस्थितीमुळे नऊ ऑगस्टपासून 67 जणांचा मृत्यू झाला आहे, तर यातील 25 मृत्यू आजच्या एकाच दिवसात झाले आहेत. तर दुसरीकडे कोचीन विमानतळात पाणी भरल्यामुळे सेवा रद्द करण्यात आली आहे.
केरळच्या 12 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार आहे, असा विश्वास मोदींनी दिला.
कोचीन विमानतळ शनिवारपर्यंत बंद राहणार
मुसळधार पावसामुळे केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच 39 पैकी 35 धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. पुरामुळे कोचीन विमानतळ शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या विमानतळावर अक्षरशः पूरस्थिती पाहायला मिळाली.
कोची विमानतळालगत असलेल्या पेरियार नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आलं. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून आज दुपारी 2 वाजेपर्यंत एकही विमान उड्डाण करणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा चालू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोचीन प्रशासनाने सांगितलं. पण पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्याने शनिवारपर्यंत विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण राज्यात बचाव मोहिम सुरु असून लोकांना मदत छावण्यांमध्ये पोहोचवलं जात आहे. सरकारने एर्नाकुलममधील पेरीयार नदी, इडुक्की आणि थ्रिसूर येथे राहणाऱ्या लोकांना मदत छावण्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement