एक्स्प्लोर

Kerala Election 2021: केरळमध्ये 'डाव्यां'ना स्पष्ट बहुमत, चर्चेत आलेल्या 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा पराभव

Kerala Election 2021: केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिलं आहे.मतमोजणी आता अंतिम टप्प्यात असून एलडीएफला बहुमत मिळाल्याचे जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे

तिरुवनंतपुरम: केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिलं आहे. सध्याचे कल आणि हाती आलेल्या निकालानुसार LDF ला  99 जागांवर आघाडी आहे. तर विरोधी UDF ला 41 जागांवर आघाडी आहे. मतमोजणी आता अंतिम टप्प्यात असून एलडीएफला बहुमत मिळाल्याचे जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. केरळमध्ये भाजपला अद्याप खातंही उघडता आलेलं नाही. केरळमध्ये 140 जागांवर निवडणुका झाल्या. इथं बहुमतासाठी 71 जागांची गरज असते. दरम्यान केरळमध्ये स्पष्ट बहुमताने आपलं सरकार पुन्हा सत्तेत आलं असल्याचा दावा एलडीएफच्या नेत्यांनी केला आहे. 

 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा पराभव

या निवडणुकीत सर्वांचं लक्ष असलेले  'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. पलक्कड विधानसभा मतदारसंघातून 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. सुरुवातीला ते आघाडीवर होते मात्र नंतरच्या फेरीत ते चांगलेच पिछाडीवर गेले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शफी परामबिल यांनी विजय मिळवला.

परमबिल यांना  42534 (38.71%) वोट मिळाले तर श्रीधरन यांना  41561 (37.83%) मतं मिळाली. निवडणुकीच्या आधी ई श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचं मुख्य लक्ष्य केरळमध्ये भाजप सत्तेवर आणण्याचं आहे असं त्यांनी सांगितलं होते. ते स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानत होते.  केरळमध्ये भाजपनं विजयासाठी खूप मेहनत घेतली होती. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी केरळमध्ये प्रचार केला होता मात्र तिथे भाजप अद्याप खातंही उघडू शकलेला नाही.  

मुख्यमंत्री पिनराई विजयन आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. केरळमध्ये भाजपची जादू चालली नाही हे आता स्पष्ट झालंय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget