एक्स्प्लोर
आधी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली, नंतर ट्विटर अकाऊंट डिलीट केलं
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना एका व्यक्तीने मदतीसाठी ट्वीट केलं. ट्वीट करणाऱ्या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्ये त्याचं लोकेशन भारत व्याप्त काश्मिर असं लिहिलेलं होतं. स्वराज यांनीही तत्परता दाखवत त्याला उत्तर दिलं. सोबतच भारत व्याप्त काश्मिर असा कोणता प्रांत अस्तित्वात नसल्याचं ट्वीटकर्त्याला दाखवून दिलं.
![आधी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली, नंतर ट्विटर अकाऊंट डिलीट केलं kashmiri student asks sushma swaraj for help she tells him no place like indian occupied kashmir latest updates आधी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली, नंतर ट्विटर अकाऊंट डिलीट केलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/31125303/sushma-swaraj-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना एका व्यक्तीने मदतीसाठी ट्वीट केलं. ट्वीट करणाऱ्या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्ये त्याचं लोकेशन भारत व्याप्त काश्मिर असं लिहिलेलं होतं. स्वराज यांनीही तत्परता दाखवत त्याला उत्तर दिलं. सोबतच भारत व्याप्त काश्मिर असा कोणता प्रांत अस्तित्वात नसल्याचं ट्वीटकर्त्याला दाखवून दिलं.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/994412616394031104
शेख अतीक नावाच्या एका विद्यार्थ्याने आपण फिलिपिन्समध्ये शिकत असून आपला पासपोर्ट खराब झाला असल्याचं ट्वीट केलं. मेडिकल चेकअपसाठी आपल्याला भारतात येणं गरजेचं असून एका महिन्यामागे आपण त्यासाठी अर्ज केल्याचंही त्याने म्हटलं होतं.
त्याच्या ट्विटर अकाऊंटवर तो भारतव्याप्त काश्मिरचा असल्याचं लिहिलेलं होतं. याच गोष्टीवरुन सुषमा स्वराज यांनी त्याचा पुरता समाचार घेतला. तसंच असा कोणताही प्रांत अस्तित्वात नसल्याचं उत्तरही दिलं. जर तुम्ही काश्मिरमधील असता तर तुमची नक्की मदत केली असती असंही सुषमा स्वराज म्हणाल्या.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/994416288368742401
त्यानंतर त्या विद्यार्थ्याने आपल्या प्रोफाईलवर फक्त काश्मीर लोकेशन अपडेट केलं. बातम्यांमध्ये हा सर्व आल्यानंतर विद्यार्थ्याने आपलं अकाऊंटच बंद केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)