Karnataka Election 2023: कर्नाटक (Krnataka) विधानसभा निवडणुकांसाठी (Election) 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर कर्नाटकाच्या सर्व 224 जागांसाठी होणाऱ्या निवडणूकांचा निकाल (Election Result)13 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. कर्नाटकात भाजपा एकीकडे पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत तर इतर राजकीय पक्ष देखील निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपासह इतर राजकिय पक्षदेखील सत्ता स्थापनेचा दावा करत आहेत. 


कर्नाटकात एकूण 224 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. तर कर्नाटकात अनेक व्हीआयपी जागांसाठीची लढत ही रंगतदार होणार असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या निवडणुकांमध्ये जेष्ठ राजकीय नेत्यांसोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील या निवडणुकांच्या रिंगणात आहेत. कर्नाटकातील या महत्त्वाच्या जागांविषयी सविस्तर जाणून घेऊया. तसेच 2018 मधील निवडणुकांमध्ये कोणत्या जागेवर सर्वात कमी मतं पडून विजय मिळण्यात आला होता, तर कोणत्या जागांवर सगळ्यात कमी मतं पडून विजय मिळवण्यात आला होता हे देखील पाहूया. 


शिग्गाव मतदारसंघ  (Shiggaon Assembly constituency)


कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Bommai) यांनी हावेरी जिल्ह्यांतील शिग्गाव मतदार संघातून भाजपाचे उमेदवार आहेत. तर याच जागेवर काँग्रेसकडून यासिर अहमद खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांमधील लढत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2018 या जागेवर बसवराज बोम्मई यांनी विजय मिळवला होता. बोम्मई यांना 83,868 इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार सईद अजीमपीर खदरी यांना 37,819 मतं मिळाली होती. 


वरुणा मतदारसंघ (Varuna Assembly constituency


काँग्रेसचे जेष्ठ नेते सिद्धारमैया यांचा हा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं जातं. 2018 मध्ये त्यांनी या जागेवर त्यांचा मुलगा यतींद्र यांना उमेदवारी दिली होती. या निवडणूकांसाठी सिद्धारमैया यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून मंत्री वी.सोमन्ना यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. 2018 च्या निवडणूकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ.सिद्धारमैया यांनी 96435 मतं मिळवून विजय मिळवला होता तर भाजपाचे उमेदवार तोतदप्पा बसवराज यांना 37819 मतं मिळाली होती. 


चित्तापूर मतदारसंघ (Chittapur Assembly constituency) 


काँग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांना  चित्तापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ अनुसुचीत जातीसाठी राखीव आहे.  तर भाजपाचे मणिकांता राठोड हे या मतदारसंघासाठी रिंगणात आहेत. 2018 मध्ये प्रियांक खरगे यांनी 69,700 जागा मिळवून या जागेवर विजय मिळवला होता. 


तीर्थहळ्ळी मतदारसंघ (Thirthahalli Assembly constituency) 


कर्नाटकाच्या या जागेवर कर्नाटकाचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र हे निवडणूक लढवणार आहेत . तर काँग्रेसने या जागेवर किम्माने रत्नाकर यांना मैदानात उतरवले आहे. 2018 मध्ये अरागा ज्ञानेंद्र यांनी 67527 मतं मिळवून विजय प्राप्त केला होता. 


कनकपुरा मतदारसंघ (Kanakpura) 


प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यामुळे ही जागा चांगलीच चर्चेत आहे. शिवकुमार (D. K. Shivkumar) या जागेवरुन सात वेळा जिंकून आले आहेत. त्यामुळे काँग्रसने त्यांना यावेळेस देखील या जागेची उमेदवारी दिली आहे. 2018 साली या जागेवर काँग्रेसचे उमेदवार डीके. शिवकुमार यांना 127552 मतं मिळाली होती आणि त्यांचा विजय झाला होता. तर त्यांच्या विरोधात असणारे जेडीएसचे उमेदवार नारायण गौडा यांना 47643 मतं मिळाली होती. 


या जागेवर सर्वात जास्त अंतराने विजय मिळवला होता


पुलकेशीनगर मतदारसंघ 


2018 च्या निवडणूकांमध्ये या जागेवर सर्वात जास्त मतांच्या फरकाने विजय निश्चित करण्यात आला होता. या जागेवर काँग्रेचे अखंड श्रीनिवास मूर्ती यांना 97,574 मतं मिळाली होती. तर जेडीएसचे उमेदवार एस.बी प्रसन्न कुमार यांना 15,948 मतं मिळाली होती. या दोघांच्या मतांमधील अंतर हे 81,626 इतकं होतं. 


वरुणा मतदारसंघ (Varuna Assembly constituency


 2018 च्या निवडणूकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ.सिद्धारमैया यांनी 96435 मतं मिळाला होती. तर  भाजपाचे उमेदवार तोतदप्पा बसवराज यांना 37819 मतं मिळाली होती. या दोघांच्या मतांमधील अंतर हे 58,616 इतकं होतं. 


मद्दुर मतदारसंघ  (Maddur Assembly constituency)


जेडीएसचे उमेदवार सी थमन्ना यांना 109,239 इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार जीएम मधू यांना या जागेसाठी 55,209 इतकी मतं मिळाली होती. या दोघांच्या मतांमधील अंतर हे 54,030 मतांचं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rahul Gandhi In Karnataka : फूड डिलिव्हरी पार्टनर्ससह नाश्ता, बाईक राईड; कर्नाटकात राहुल गांधींचा कामगारांसोबत संवाद