एक्स्प्लोर

मुख्यमंत्री असावा तर असा... बंगळुरूमधील मुख्यमंत्र्यांसाठीचे 'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल' मागे घेण्याचे सिद्धरमय्यांचे आदेश

Karnataka CM Siddaramaiah: कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरमय्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी एकापाठोपाठ एक कामांता सपाटा लावला आहे.

Karnataka CM Siddaramaiah: कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सिद्धरमय्या (Karnataka CM Siddaramaiah) अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी कामांचा सपाटा लावला आहे. नवनिर्वाचित सिद्धरमय्या (Siddaramaiah) सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी सर्वात आधी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यानंतर रविवारी (21 मे) रोजी त्यांनी एक विशेष आदेश जारी केला. ज्यामध्ये त्यांनी बंगळुरू पोलिसांना (Bangalore Police) मुख्यमंत्र्यांसाठीचा 'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल' (Zero Traffic Protocol) मागे घेण्यास सांगितलं. 

सीएम सिद्धरमय्या म्हणाले की, लोकांच्या समस्या लक्षात घेऊनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी सिद्धरमय्या यांनी ट्वीट केलं की, "मी बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांना माझ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी 'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल' मागे घेण्यास सांगितलं आहे. लोकांच्या समस्या पाहून मी हा निर्णय घेतला आहे. जिथे 'झिरो ट्राफिक प्रोटोकॉल' लागू करण्यात आला आहे, तिथे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो." दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देत त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अनेक युजर्सनी 'आऊटस्टॅडिंग सीए', असं म्हणत कमेंट केल्या आहेत. तर काहींनी 'मुख्यमंत्री असावा असा', असं म्हणत सिद्धरमय्या यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सिद्धरमय्या फुलांचे हार किंवा शॉल स्वीकारणार नाहीत

यासोबतच सीएम सिद्धरमय्या यांनी सत्कार करताना दिलेले फुलांचे पुष्पगुच्छ, हार किंवा शॉल स्वीकारणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. "मी लोकांकडून फुलांचे पुष्पगुच्छ, हार किंवा शॉल न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, जे नेहमीच सत्कार करताना देतात. हे वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही कार्यक्रमांमध्ये घडतं. लोक त्यांचं प्रेम भेट म्हणून देतात. जर तुम्हाला अधिक आदर व्यक्त करायचा असेल तर, तुम्ही पुस्तकं देऊ शकता. तुमचं सर्व प्रेम आणि आपुलकी माझ्या पाठीशी राहो."

सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्री होताच पूर्ण केली जाहीरनाम्यातील आश्वासनं 

'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल'बाबत निर्णय घेण्यापूर्वीच सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांनुसार, पाच हमी योजना लागू केली आहे. काँग्रेसच्या पाच हमी योजनांमध्ये सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेला प्रत्येकी दोन हजार रुपये दरमहा, बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो मोफत तांदूळ, बेरोजगार पदवीधर तरुणांना दरमहा रुपये 3000 आणि बेरोजगार पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1500 रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी मोफत प्रवास, अशा घोषणांची पूर्तता केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Hijab Ban: हिजाब बंदी काँग्रेस हटवणार? कर्नाटकातील एकमेव मुस्लिम महिला आमदार म्हणतात...

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget