मुंबई: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत हिच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी शुक्रवारी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.


अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर कंगनाने सोशल मीडियात समाजात तेढ निर्माण होईल असे काही ट्वीट केले होते. त्याचाच फटका कंगनाला आता बसण्याची शक्यता आहे. कंगनाच्या सोशल मीडियातील पोस्ट विरोधात पेशाने कास्टिंग डायरेक्टर असणाऱ्या साहिल सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे कोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेऊन वांद्रे कोर्टाने कंगनाच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा आदेश मुंबई पोलिसांना दिला होता.


शशी थरुर यांचं कंगनाला उत्तर- प्रत्येक महिला आपल्यासारखी सशक्त व्हावी ही माझी इच्छा


कोर्टाच्या आदेशनानंतर वांद्रे पोलिसांनी तात्काळ कलम 153 ए, कलम 295 ए आणि कलम 124 ए अंतर्गत अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या दाखल केलेल्या या गुन्ह्यानंतर कंगनाने हायकोर्टात धाव घेत हा गुन्हाच रद्द करावा अशी मागणी केली होती. यावर हायकोर्टाने कंगनाला 8 जानेवारीला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंदवावा असा आदेश दिला होता.


पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधी कंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्याला राजकारणाचा बळी बनवण्यात येतोय असा आरोप करत राज्य सरकारवर टीका केली होती.


कमल हसनच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाचं पाठबळ, बाहेर नोकरी करणाऱ्या पुरुषांइतकंच गृहिणींचं काम तोलामोलाचं


वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कंगनाची आणि तिच्या बहीणीची चौकशी करताना पोलिसांनी तिची बाजू ऐकूण घेतली आणि तसा जबाब नोंदवून घेतला आहे. मुंबई पोलिसांनी विविध सोशल माध्यमांकडून याविषयी माहिती मागवली आहे.


Twitter War | 'तुला PR च करु का, माझा विसरच पडत नाही हिला'; दिलजीत- कंगनामध्ये पुन्हा जुंपली


अभिनेत्री कंगनाने काही दिवसांपूर्वी ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या विविध सोशल मीडियमध्ये पोस्ट लिहिल्या होत्या. ज्या पोस्ट बाबत हरकत घेण्यात आलेली आहे त्याबाबतचा अहवालच मुंबई पोलिसांनी या तिन्ही कंपन्यांना पत्र लिहून मागितला आहे. संबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतरच पोलीस पुढचा तपास करुन कोर्टात अहवाल सादर करतील आणि कोर्टाच्या पुढील आदेशाप्रमाणे पोलीस कारवाई करतील. त्यामुळे आगामी काळात या संपूर्ण प्रकरणी काय होणार, कंगना विरुद्ध दाखल राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रद्द होणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


पहा व्हिडीओ: Kangana Ranaut | देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी कंगनाची मुंबई पोलिसांकडून दोन तास चौकशी



कंगनाची कमल हसन आणि शशी थरुर यांच्यावर टीका, घरकामाला प्राइस टॅग लावू नका