मुंबई: गृहिणींच्या कामाला आर्थिक वेतनाच्या श्रेणीत आणून त्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा निर्णय कमल हसन यांच्या मक्कल नीधी मय्यम (MNM) पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आला आहे. त्याला कॉंग्रेस नेता शशी थरुर यांनींही आपला पाठिंबा दर्शवलाय. आता या प्रश्नावरुन कंगना रनौतने या दोघांवरही टीका केली आहे.


कमल हसन यांनी तामिळनाडूतील विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु करत आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की मक्कल नीधी मय्यमचे सरकार सत्तेत आल्यास गृहिणींच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांना मासिक वेतन देण्यात येईल.


या प्रश्नावरुन कंगना रनौतने कमल हसन आणि शशी थरुर यांच्या भूमिकेची खि्ल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली आहे. ती म्हणते, "आमच्या प्रेमावर प्राइस टॅग लावू नये. आमच्या मातृत्वावर आणि आपल्या लोकांची काळजी घेण्याच्या स्वभावाची भरपाई करण्याचा प्रयत्न करु नये. आमच्या लहानशा जगाची राणी बनण्यासाठी आम्हाला कोणत्याही वेतनाची गरज नाही. प्रत्येक गोष्ट व्यवहाराच्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करु नका. केवळ प्रेम, सन्मान आणि वेतनापेक्षाही तुम्हाला स्वीकारणाऱ्या महिलेला शरण जा."





Tamil Nadu Election 2021: आता गृहिणींना मिळणार मासिक वेतन, कमल हसन यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासन


कंगना रनौत आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये म्हणाली की, "घरच्या मालकाला घरचा नोकर करणे ही गोष्ट खूपच वाईट असेल. संपूर्ण जीवनभर महिलांनी केलेल्या त्यागावर कोणतेही प्राइस टॅग लावता येत नाही. हे तुम्ही देवाच्या निर्मितीवर देवाला पेमेंट करण्यासारखं आहे. ही कल्पना काही अंशी दुःखद आहे तर काही अंशी मजेशीर आहे."





या वर्षी तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कमल हसनच्या मक्कल नीधी मय्यमने आपला आर्थिक अजेंडा जनतेसमोर मांडला आहे. त्यामध्ये तामिळनाडूतील गृहिणींना महिन्याकाठी आर्थिक वेतन देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.


उर्मिला मातोंडकरांनी मुंबईत कार्यालय खरेदी करताच कंगना म्हणते, 'काश मैं भी....'


कमल हसनच्या मक्कल नीधी मय्यमच्या पक्षातर्फे जाहीर करणाऱ्या आर्थिक अजेंड्यात सांगण्यात आलं आहे की महिला घरी करत असलेलं काम समाजाकडून दुर्लक्षित केलं जातं, त्यांच्या कामाला मोल केलं जात नाही. तसंच या कामाचं योगदानही लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे या दुर्लक्षित पण महत्वपूर्ण कामाला आता मान्यता देण्यात येणार असून त्यांना मासिक वेतन देण्यात येईल


बिकीनी फोटोची तुलना दुष्टांचा संहार करणाऱ्या आई भेरवीशी? कंगना रनौतच्या अजब तर्कटाने सोशल मीडियावर चर्चांना ऊत


कॉग्रेस नेते शशी थरुर यांनी कमल हसन यांच्या या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "गृहिणींच्या कामाला आर्थिक वेतन देण्याच्या कमल हसन यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे गृहिणींच्या सेवेला मूल्य मिळेल आणि समाजात त्यांच्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. तसेच यामुळे महिलांचे सबलीकरण होण्यास मदत होईल."


कंगना रनौत सध्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित तयार करण्यात येत असलेल्या चित्रपटात जयललितांची भूमिका साकारत आहे. तसेच कमल हसन तामिळनाडूत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय नशीब आजमावत आहे.


देश वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी, कंगनाच्या ट्वीटला शाहीनबागच्या आज्जीचं उत्तर