एक्स्प्लोर

काँग्रेसमध्ये अहमद पटेलांची जागा घेणार कमलनाथ, नाराज 23 नेत्यांचं काय होणार?

काँग्रेस पक्षात अहमद पटेल यांची जागा नेमकी कोण घेणार? 23 नेत्यांच्या नाराजीचं काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण त्यासंदर्भातल्या घडामोडींना राजधानी दिल्लीत वेग आला आहे.

नवी दिल्ली : जवळपास दीड वर्ष पूर्णवेळ अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसमध्ये अखेर बदलांची हालचाल सुरु झाली आहे. एकीकडे पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांना सोनिया गांधी भेटणार आहेत तर दुसरीकडे अहमद पटेल यांची जागा कोण घेणार याचा शोध सुरु झाला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

अहमद पटेल यांची जागा घेणं म्हणजे एकावेळी पक्ष आणि तिजोरी सांभाळणं, हायकमांड आणि पक्षातला दुवा बनणं. कमलनाथ हे संजय गांधी यांचे सहकारी, तेव्हापासून ते गांधी घराण्याच्या विश्वासू वर्तुळातले राहिले आहेत. शिवाय उद्योगाची पार्श्वभूमी असल्यानं पक्षाला आवश्यक असलेले फंड ते आणू शकतील असा कयास आहे. गहलोत यांच्याही नावाची यासाठी चर्चा सुरु आहे.

अहमद पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसमध्ये नव्या आणि जुन्या पिढीतला समतोल साधण्याचं काम ते करत होते. शिवाय हायकमांडला संघटनेच्या अंतर्गत बित्तंबातमी त्यांच्याच माध्यमातून पोहचत होती. आता कमलनाथ यांच्या नावाची चर्चा झाली तेव्हा कमलनाथ यांनी मात्र निवृत्तीबद्दलचं एक विधान केलं. तर गहलोत यांच्या दिल्लीवारीनं ही जागा नेमकी कोण घेणार याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

एकीकडे काँग्रेसमध्ये पत्र लिहिणारे 23 नेते शनिवारी सोनिया गांधींना भेटणार आहेत. आॅगस्ट महिन्यात या नेत्यांनी पत्र लिहून पक्षाच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. या बैठकीचं सर्वात मोठं वैशिष्टय म्हणजे पहिल्यांदाच या नेत्यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल. कारण या नेत्यांचं पत्र लीक झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली होती. मात्र त्यात बाकीच्या नेत्यांनी टीकेचा भडीमार केल्यानं तेव्हा त्यांच्या पत्राच्या आशयावर चर्चाच होऊ शकली नव्हती.

महाराष्ट्रातले मुकूल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा या पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश होता. उद्या सकाळी 10 वाजता दिल्लीत सोनिया गांधी या 23 नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यातून काय मंथन समोर येतं. पक्षाच्या पुढच्या वाटचालीबद्दल त्यांना काय विश्वास दिला जातो हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Abhijeet Dipke : हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा
हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget