एक्स्प्लोर
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून बालाजीच्या चरणी 5.45 कोटींचे दागिने

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल 5 कोटी 45 लाख रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्याच्या आनंदात त्यांनी हे दान केलं आहे.
के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमाला तिरुपती मंदिरात आज सकाळी विशेष पूजा केली. त्यात भगवान व्यंकटेश्वराच्या चरणी दागिने अर्पण केले.
"मुख्यमंत्री बनल्यानंतर के चंद्रशेखर राव यांनी पहिल्यांदाच बालाजीचं दर्शन घेतलं. या पूजेमध्ये राव यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि कॅबिनेट मंत्रीही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी नवस केला होता. त्यामुळे 2014 मध्ये स्वतंत्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी भगवान व्यंकटेश्वरला दान केलं," असं तेलंगणा सरकारचे सल्लागार के व्ही रमणचारी यांनी सांगितलं.
के.चंद्रशेखर राव यांनी केलेल्या दानामध्ये सुमारे 3.7 कोटी किंमतीचा 14.20 किलोचा शालीग्राम हरम आणि 1.2 कोटी किंमतीचा 4.65 किलोच्या मकर कंठीचा समावेश आहे. तसंच देवी पद्मावतीला 45 लाखांची नथ अर्पण करण्यात आली.
दुसरीकडे राव यांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा खर्च सरकारच्या बजेटमधून केल्याची चर्चा सुरु आहे. के.चंद्रशेखर राव यांच्यावर सरकारी पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या या कृत्यावर जोरदार टीका होत आहे. केवळ स्वत:चा खासगी नवस फेडण्यासाठी के.चंद्रशेखर राव सरकारी निधीची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
याआधी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये वारंगलच्या भद्रकाली मंदिरातही 11.2 किलो सोन्याचा मुकुट दान केला होता, ज्याची किंमत 3.5 कोटी रुपये होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
