एक्स्प्लोर

Jharkhand CM Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन फरार? भाजपच्या दाव्यानं खळबळ; दिल्लीतील निवासस्थानाला ईडीचा वेढा, BMW जप्त

Jharkhand CM Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी ईडीचं पथक पोहोचलेलं. कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी होणार आहे.

Jharkhand CM Hemant Soren Latest News: नवी दिल्ली : ईडीच्या (ED) रडारवर असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांचा गेल्या 24 तासांहून अधिक काळ ठावठिकाणा नाही. ईडीकडेही त्यांच्या ठिकाण्याबाबत कोणतीही माहिती नाही असं समजतंय. हेमंत सोरेन यांचं चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उभं आहे. त्यांच्या स्टाफचा फोनही बंद आहे. त्यांची बीएमडब्ल्यू कार ईडीने काल जप्त केलीय. त्यांच्या चालकाची चौकशी झालीय, मात्र त्याच्याकडूनही काही माहिती समोर आली नाहीये. सोरेन यांच्या शांती निकेतन, मोतीलाल नेहरू मार्गावरील घर आणि झारखंड भवन इथे ईडीची टीम गेली होती. मात्र सोरेन भेटू शकले नाहीत. 31 जानेवारीला सोरेन रांचीतल्या आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी उपलब्ध असतील असं त्यांच्या कार्यालयाने ईमेलद्वारे ईडीला कळवलंय. राजकीय हेतूंनी ही चौकशी प्रेरित असून ईडीमार्फत त्यांचं सरकार अस्थिर केला जातोय असा आरोप या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. 

दिल्ली पोलिसांसह ईडीची टीम सोमवारी सकाळी 9 वाजता दक्षिण दिल्लीतील 5/1 शांती निकेतन भवनात पोहोचली आणि रात्री साडेदहा वाजेपर्यंत तिथे उपस्थित होती. त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास ईडीचे अधिकारी सोरेन यांच्या निवासस्थानाहून परतताना दिसले. सीएम सोरेन यांच्या निवासस्थानातून तपास यंत्रणेनं बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रं जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बदनामीचे षड्यंत्र : JMM

झारखंडटे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की, ही संपूर्ण घटना हेमंत सोरेन यांना बदनाम करण्याचा कट आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीला सातत्यानं उत्तरं दिली आहेत. 31 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरी जबाब नोंदवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलेत : JMM

झारखंडचे मुख्यमंत्री 27 जानेवारीला रांचीहून दिल्लीला रवाना झाले होते. त्यांचा पक्ष जेएमएमनं सोमवारी सांगितलं की, ते वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलेत आणि काम झालं की परत येतील. दरम्यान, भाजपच्या झारखंड युनिटनं सोमवारी दावा केला की, ईडी कारवाईच्या भीतीनं मुख्यमंत्री सोरेन गेल्या 18 तासांपासून फरार आहेत. यादरम्यान भाजपनं राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आणि झारखंडची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

झारखंड जमीन घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय? 

जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. पण हे प्रकरण नेमकं काय? ईडीनं रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या 4.55 एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ईडीनं रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रं आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते. ईडी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची या कागदपत्रांची तपासणी आणि त्यांच्याशी संबंधित तथ्यांच्या पडताळणीसंदर्भात चौकशी करत आहे.

प्रदीप बागची, विष्णू कुमार अग्रवाल, भानू प्रताप प्रसाद आणि इतरांविरुद्ध झारखंड पोलीस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवून तीन जमीन घोटाळ्यांचा तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना ईडीनं आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं भूमाफियांच्या नावे फसवणूक करून भूखंड हस्तांतरित केल्याचं तपासात उघड झालंय.

अटक करण्यात आलेल्या 14 आरोपींमध्ये प्रदीप बागची, अफसर अली, सद्दाम हुसेन, इम्तियाज अहमद, तल्हा खान, फैयाज खान, भानू प्रताप प्रसाद, छवी रंजन, आयएएस (माजी डीसी रांची) दिलीप कुमार घोष, अमित कुमार अग्रवाल, विष्णू कुमार अग्रवाल यांचा समावेश आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेनं आतापर्यंत 236 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP On Mahapalika Election |  मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special ReportNew India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special ReportShanishingnapur Shanidev | एक मार्चपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक Special ReportSpecial Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.