Jawed Habib : केस कापताना पाण्याऐवजी थुंकीचा वापर, जावेद हबिबचा माफीनामा, म्हणाला...
Jawed Habib : जावेद हबिबने व्हिडीओ शेअर करून माफी मागितली आहे.
![Jawed Habib : केस कापताना पाण्याऐवजी थुंकीचा वापर, जावेद हबिबचा माफीनामा, म्हणाला... jawed habib apologises for spitting on woman hair in training seminar Jawed Habib : केस कापताना पाण्याऐवजी थुंकीचा वापर, जावेद हबिबचा माफीनामा, म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/fb7896598328ab4f4db4e5daec004900_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jawed Habib : प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबिबचा नुकताच (Jawed Habib) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ जावेद हबिबच्या सेमिनारमधील आहे. व्हिडीओमध्ये जावेद हबिब एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे केस कापताना जावेब हबीबने पाण्याऐवजी थुंकीचा वापर केला.
व्हिडीओमध्ये असे दिसत होते की जावेद हबिब एका महिलेचे केस कापताना थुंकीचा वापर करतो. त्यानंतर तो म्हणाला, 'या थूंकीत जादू आहे'. जावेद हबिबच्या या किळसवाण्या कृत्यामुळे त्याला अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केले. त्यानंतर आता जावेद हबिबने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांची माफी मागितली आहे.
व्हिडीओमध्ये जावेद हबिब म्हणतो, 'माझ्या सेमिनारमध्ये जी गोष्ट घडली त्याबद्दल काही लोकांना वाईट वाटले. अशा प्रोफेशनल सेमिनारमध्ये काही मजेशीर गोष्टी कराव्या लागतात. पण जर तुम्हाला हे आवडलं नसेल किंवा या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर मी सर्वांची माफी मागतो. '
View this post on Instagram
ज्या महिलेचे केस कापताना जावेदने पाण्याऐवजी थुंकीचा वापर केला होता, त्या महिलेने देखील प्रतिक्रीया दिली आहे. तिचं नाव पूजा गुप्ता असं आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये ती म्हणाली, 'माझे नाव पूजा गुप्ता आहे. वंशिका ब्यूटी पार्लर या नावाने माझे पार्लर सुरू आहे. मी बडौत येथे राहणारी आहे. मी काल जावेद हबीब सरांच्या कार्यशाळेला गेले होते. त्यांनी केस कापण्यासाठी मला स्टेजवर बोलवले. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले. त्यांनी पाणी नसेल तर थुंकीचा वापर करत हेअर कट कसा करायचा हे दाखविले. त्यानंतर मी हेअरकट नाही केला. या प्रकारानंतर मी परत कधीच जावेद हबीबकडे केस कापणार नाही'
For those who goes to Javed Habib's saloon pic.twitter.com/dblHxHUBkw
— Rishi Bagree (@rishibagree) January 5, 2022
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)