राजौरी : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Encounter) सैन्य दलाकडून सर्च ऑपरेशन (Indian Army Search Operation) राबवलं जात आहे. या परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम राबवली जात आहे. काश्मीरच्या राजौरी (Rajouri Encounter) भागात सैन्य दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यादरम्यान, सैन्य दलाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. राजौरी भागात झालेल्या चकमकीत कुत्र्याला गोळी लागली होती.
तिरंग्यामध्ये लपेटून केंटला अखेरचा निरोप
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी (Rajouri Encounter) येथे सुरक्षा दलांच्या (Indian Army) तुकडीचं नेतृत्व करताना गोळी लागल्याने आर्मी डॉग युनिटचा एक भाग असलेल्या केंट नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. 12 सप्टेंबर रोजी, राजौरीमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या गोळीबारात भारतीय लष्कराच्या 21 आर्मी डॉग युनिटमधील केंटचा मृत्यू झाला. केंट या सहा वर्षीय मादी लॅब्राडोरचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. तिरंग्यामध्ये लपेटून भारतीय लष्कराने केंट या कुत्र्याला अखेरचा निरोप दिला.
राजौरीमध्ये दहशतवादी आणि सैन्य दलात चकमक
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात छापा टाकण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सैन्य दलाने एका दहशतवाद्याला ठार केलं.
दहशतवाद्यांचा सैन्य दलावर हल्ला
राजौरी भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्य दलाला मिळाली होती. त्यानुसार, या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. यावेळी दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराला चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सैन्य दलाने दहशतवाद्यांचा पाठलाग केला. यावेळी लष्कराच्या पथकामध्ये केंट हा कुत्रा देखील होता. केंटने माग काढत लष्कराला दहशतवाद्यांना शोधण्यात मदत केली.
तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश
यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सैन्य दलानेही गोळीबार केला. मात्र, दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु असताना एक गोळी केंटला लागली. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर सुरक्षा दलाने तीन हशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र, 21 आर्मी डॉग युनिटमध्ये समाविष्ट असलेल्या केंट नावाच्या भारतीय लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. केंटला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :