काश्मीर : भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army) जवानांना मोठं यश मिळालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरु आहे. नारला गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला (Terrorist) कंठस्नान घातलं आहे. दरम्यान, यावेळी एक जवान शहीद (Jammu and Kashmir News) झाला असून आणखी तीन जवान जखमी झाली आहे. यासोबत लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. 21 आर्मी डॉग युनिटमध्ये समाविष्ट असलेल्या केंट नावाच्या भारतीय लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे.


राजौरीमध्ये दहशतवादी आणि सैन्य दलामध्ये चकमक


लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात छापा टाकण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सैन्य दलाने एका दहशतवाद्याला ठार केलं.


लष्कराच्या कुत्र्याचा मृत्यू


लष्कराच्या या ऑपरेशनदरम्यान या सहा वर्षांच्या मादी लॅब्राडोर कुत्र्याला गोळी लागली. त्यानंतर उपचारादरम्यान या कुत्र्याचा मृत्यू झाला. केंट पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात सैनिकांच्या एका पथकाचं नेतृत्व करत होता. यावेळी त्याला गोळी लागली.


लष्कराकडून परिसरात नाकेबंदी


अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, सुरक्षा दलाला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार परिसरात नाकेबंदी आणि शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरुवातीच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता, तर अतिरेक्यांना ठार मारण्यासाठी अतिरिक्त फौजा चकमकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यानी सांगितलं की, सुरक्षा दलांनी सोमवारी, 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पत्राडा भागातील जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली होती आणि दोन लोकांच्या संशयास्पद हालचाली पाहता काही लोकांवर गोळीबारही केला होता.


दहशतवाद्यांची बॅग जप्त


सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देत सांगितलं की, दोन संशयित दहशतवादी अंधाराचा आणि घनदाट जंगलाचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पण सुरक्षा दलांनी जप्त केलेली बॅग मागे सोडली. सैन्य दलानेही बॅग जप्त केली. त्यातून काही कपडे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. फरार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी बांबल आणि नारला तसेच आसपासच्या भागात नाकाबंदी आणि शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांवर मोठी कारवाई, संपत्ती जप्त करण्यास सुरुवात