एक्स्प्लोर

Jammu And Kashmir: शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

शोपियानमध्ये आज शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

Encounter In Jammu And Kashmir : दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये आज शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. या परिसरात सुरक्षा दलाकडून अद्याप ऑपरेशन सुरूच आहे. शोपियानच्या झैनापोरा आणि चेरमार्ग भागात सुरक्षा दलाच्या जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.

दरम्यान,  याबाबत काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी ही चकमक शोपियानच्या झैनापोरा आणि चेरमार्ग भागात सुरू झाली. यादरम्यान, तेथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जावानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दक्षिण काश्मीर हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. अनेकदा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमकीच्या घटना समोर येत असतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) चे होते. 29 जानेवारी रोजी अनंतनागमध्ये हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांच्या हत्येमध्ये एका दहशतवाद्याचा हात होता.

 

Jammu And Kashmir: शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

दरम्यान,11 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्येही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले होते. तसेच 7 फेब्रुवारीलाही जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एक दहशतवाद्याचा खात्मा केल्याची घटना घडली होती. मागील काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांनी 11 जणांना अटक करून प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. त्यांच्याकडून शस्त्रं आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह्य साहित्य जप्त करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
Delimitation Bill : उत्तर प्रदेशात 40 तर महाराष्ट्रात 24 खासदार वाढणार, नव्या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात किती वाढ? जाणून घ्या आकडेवारीचे टेबल
उत्तर प्रदेशात 40 तर महाराष्ट्रात 24 खासदार वाढणार, नव्या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात किती वाढ? जाणून घ्या आकडेवारीचे टेबल
Delimitation Bill Copy : मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget