Jammu Kashmir News : NIA ने सोमवारी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा (Kupwara Distict)  जिल्ह्यातून पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LET) द्वारे चालवल्या जाणाऱ्या नार्कोटिक्स-टेररिझम मॉड्यूलच्या प्रमुख ऑपरेटरला अटक केली आहे. फेडरल एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 45 वर्षीय अब्दुल रौफ बदन, जो तंगधरमधील कर्नाहच्या अमरोही गावचा रहिवासी आहे, हा 2020 मध्ये झालेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला 12वा आरोपी आहे.


पाकिस्तानी मास्टर्सच्या इशाऱ्यावर काम 


एजन्सीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अमरोही येथील नियंत्रण रेषेवरून (LOC) भाजीपाल्यांनी भरलेल्या वाहनांमध्ये लपून अमली पदार्थ, रोख रक्कम, शस्त्रे आणि दारूगोळा पुरवल्याबद्दल बदनला अटक करण्यात आली होती. तो लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलचा मुख्य ऑपरेटर आहे, जो पाकिस्तानी मास्टर्सच्या इशाऱ्यावर काम करत होता.


11 आरोपींविरुद्ध यापूर्वीच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल 


एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक करण्यात आलेला अब्दुल रौफ बदन हा तंगधर आणि नियंत्रण रेषेजवळील इतर ठिकाणी पाकिस्तानी हँडलर्सकडून अंमली पदार्थ गोळा करत असे आणि या प्रकरणातील इतर आरोपींना देत असे. 11 जून 2020 रोजी कुपवाडा येथील हंदवाडा पोलीस ठाण्यात सुरुवातीला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच वर्षी 23 जून रोजी एनआयएने त्याची पुन्हा नोंद केली होती. या प्रकरणातील 11 आरोपींविरुद्ध एजन्सीने यापूर्वीच जम्मू येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.


घुसखोरीचा प्रयत्न 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army) जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न (Infiltrators) उधळून लावला होता. दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधून (Uri Sector) घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. सैन्य दलाचे जवान आणि बारामुल्ला पोलिसांनी घुसखोरी करणाऱ्या दहशथवाद्यांचा डाव उधळून लावत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) या दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं होतं. 


बीएसएफने अंमली पदार्थांची तस्करी उधळून लावली


चार दिवसांपूर्वी, गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत, सीमेपलीकडून होणारी अमली पदार्थांची तस्करी मोठा प्रयत्न होत असताना एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले. शोध मोहिमेनंतर बीएसएफ अधिकाऱ्यांनी संशयिताच्या पिशवीतून आठ पाकिटांमध्ये ठेवलेले आठ किलोग्राम अमली पदार्थ जप्त केले. यावेळी हा जखमी घुसखोर पाकिस्तानच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. यात तो यशस्वी होण्यापूर्वीच बीएसएफने त्याला पकडले.


संबंधित बातम्या


Pakistan Flood : महापुरामुळे पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली, पाकिस्तानच्या मंत्र्यांची माहिती


Todays Headline 30th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या