Vostok 2022 Military Exercise : भारत-चीनसह ( India And China ) अनेक देशांचे 50 हजार सैनिक ( Soldiers) रशियातील (Russia ) लष्करी सरावात (Vostok 2022 Military Exercise Update) भाग घेणार आहेत.  रशियाने (Russia ) सोमवारी याबाबत माहिती दिली. व्होस्टोक 2022 मिलिटरी सराव 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत जपानच्या समुद्रात विविध ठिकाणी आयोजित केला जाईल. या सरावामध्ये चीन आणि भारतासह विविध देशांचे 50,000 हून अधिक सैनिक सहभाग घेणार आहेत.  


रशियाची सरकारी वृत्तसंस्था टासने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने एक निवेदन जाहीर केले आहे. 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत सात प्रशिक्षण मैदानांवर आणि समुद्राच्या किनारी भागात "संरक्षणात्मक आणि आक्षेपार्ह ऑपरेशन्स" चा सराव केला जाईल.  


या सरावात 50,000 हून अधिक सैन्य आणि 5000 हून अधिक शस्त्रास्त्रे व लष्करी हार्डवेअर, 140 विमाने, 60 लढाऊ जहाजे, गनबोट्स आणि सपोर्ट जहाजे एकत्र येतील.  चीन, भारत, लाओस, मंगोलिया, निकाराग्वा, सीरिया आणि अनेक देशांचे सैनिक या लष्करी सरावात सहभागी होणार आहेत. रशियामध्ये व्होस्टोक-2022 लष्करी सरावात भारतीय सैन्याच्या सहभागावर भारतीय लष्कर किंवा नवी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाकडून सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


युद्ध सरावाबद्दल चीनने काय म्हटले?


चीनच्या संरक्षण मंत्रालयाने ( Ministry of Defense of China ) जारी केलेल्या निवेदनानुसार, पीएलएने (PLA) या युद्ध सरावात (Vostok 2022 Military Exercise Update) भाग घेण्यासाठी आपले सैनिक रशियाला पाठवले आहेत. सहभागी देशांच्या सैन्यासोबत व्यावहारिक आणि मैत्रीपूर्ण सहकार्य वाढवणे, सहभागी पक्षांसोबत सामरिक समन्वय वाढवणे आणि विविध सुरक्षा धोक्यांना तोंड देण्याची क्षमता वाढवणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे 5 मे 2020 रोजी पॅंगॉन्ग सरोवर परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीपासून पूर्व लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. या तणावानंतर आता दोन्ही देशाचे सैनिक प्रथमच एकत्र सराव करणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Mamata Banerjee Slams BJP: महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला, ममता बॅनर्जींचा भाजपला सवाल


Hijab Ban : हिजाब बंदी प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, नोटीस जारी करताना म्हटले..