Terrorist infiltration : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय लष्कराने (Indian Army) दहशतवाद्यांचा (Terrorist) आणखी एक घुसखोरीचा कट उधळून (Across Border) लावला आहे. अखनूर सेक्टरमध्ये (Akhnoor Sector) सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांना लष्कराने हुसकावून लावले. गेल्या 4 दिवसांत लष्कराने दहशतवाद्यांचा तिसरा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. काल रात्री नौशेरा सेक्टरमध्येही (Nausera Sector) दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, पण तोही लष्कराने हाणून पाडला.


...तो जखमी झाला, आणि त्याला भारतीय सेनेने पकडले


नौशेरा येथे एक दहशतवादी जिवंत पकडला गेला, तर स्फोटात दोन ठार झाले. नौशेराच्या झांगर सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांनी 21 ऑगस्टच्या सकाळी नियंत्रण रेषेजवळ 23-3 दहशतवाद्यांची घुसखोरी पाहिली होती. एका दहशतवाद्याने भारतीय चौकीजवळ येऊन कुंपण कापण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो जखमी झाला आणि त्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला पकडण्यात आले. यासोबत आलेले आणखी दोन दहशतवादी जंगलाच्या आडून पळून गेले.


6 वर्षांपूर्वीही या दहशतवाद्याला करण्यात आली होती अटक 


भारतीय सेनेसोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेला दहशतवादी तबराक हुसेन याला भारतीय लष्कराने 2016 साली अटक केली होती आणि 26 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला पाकिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. एप्रिल 2016 मध्येही तबराक हुसेनने त्याच्या दोन साथीदारांसह नौशेरा सेक्टरमधूनच घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तबरक आणि त्याचा साथीदार हारून अली याला अटक करण्यात आली होती, मात्र त्याचा तिसरा साथीदार POK मध्ये पळून जाण्यात यशस्वी झाला होता.


6 वर्षांपूर्वी 26 महिने तुरुंगात


तबराक आणि त्याचा साथीदार हारून अली या दोघांना 26 महिने भारतात तुरुंगात घालवल्यानंतर गेल्या वर्षी अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र रविवारी पुन्हा एकदा तो आत्मघातकी मोहिमेसाठी भारतात घुसखोरी करण्यासाठी नौशेरा सेक्टरमध्ये पोहोचला. यावेळी तोही भारतीय लष्कराच्या गोळीने जखमी झाला.


दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नात वाढ


जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आजकाल दहशतवादी (Terrorist) घुसखोरी करण्याचा आणि सीमेवर दहशतवादी घटना घडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये (Naushera Sector)  लष्कराने दोन दहशतवाद्यांना अटक केली. तर मंगळवारी सोपोर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.


शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सोपोर पोलिसांनी मंगळवारी लष्कर-ए-तय्यबाच्या एक हायब्रीड दहशतवाद्याला आणि एका ओजीडब्ल्यूला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


संबंधित बातम्या


Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी अटकेत, नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा कट उधळला


Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त