मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर उद्या मतदान होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता संसदेच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. इम्रान खान यांना पंतप्रधान पदवरून हटवण्यासाठी 342 सदस्यांच्या सदनामध्ये 172 मतांती आवश्यकता  आहे. सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान यांना 342 सदस्यांच्या संसदेत (राष्ट्रीय विधानसभा) 172 मतांची गरज आहे.
इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे सभागृहात 155 खासदार आहेत. इम्रान यांना सुमारे दोन डझन खासदारांचे बंड आणि मित्रपक्षांच्या आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान यांना 342 सदस्यांच्या संसदेत (राष्ट्रीय विधानसभा) 172 मतांची गरज आहे. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे सभागृहात 155 खासदार आहेत. इम्रान यांना सुमारे दोन डझन खासदारांचे बंड आणि मित्रपक्षांच्या आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या इतिहासात इम्रान खान हे पहिले पंतप्रधान असतील जे अविश्वास प्रस्तावाद्वारे हटवले जाणार आहे.


श्रीलंकेत विरोधी पक्ष उद्या अविश्वास प्रस्ताव मांडणार


आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. सत्ताधारी सरकारवर सातत्याने टीका होत आहे आणि आता श्रीलंकेतील जनता रस्त्यावर उतरत आहे. सत्ताधारी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव मांडणर आहे.  


भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तीन दिवस हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर


भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तीन दिवसाच्या हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत


राहुल गांधी यांच्या हस्ते "द दलित ट्रूथ: द बॅटल्स फॉर रियलाइजिंग आंबेडकर्स व्हिजन" पुस्तकाचे अनावरण


कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते "द दलित ट्रूथ: द बॅटल्स फॉर रियलाइजिंग आंबेडकर्स व्हिजन" या पुस्तकाचे अनावरण होणार आहे. सकाळी 11 वाजता जवाहर भवन येथे पुस्तकाचे अनावरण होणार आहे.


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच गोरखनाथ दौऱ्याचा दुसरा दिवस 


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच गोरखनाथ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे.


राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय न्यायिक संमेलनाचे उद्घाटन होणार


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुजरात येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' जवळ टेन्ट शहरात राष्ट्रीय न्यायिक संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. सुप्रिम कोर्टाचे जस्टिस डी. वाय. चंद्रचूड व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहे.


चैत्र नवरात्रातील  दुर्गाष्टमी


चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील दुर्गाष्टमी हे व्रत केले जाते. या दिवशी महागौरीची आराधना केली जाते.


दिल्लीत आजपासून एफसीआयचे गहू खरेदी अभियान


दिल्लीतील नरेला और नजफगढ़ बाजारात  गहू खरेदी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे गहू स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे.


अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. 


किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांचं समन्स


किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स बजावले आहे.  संजय राऊतांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स देण्यात आले आहे.  शनिवारी सकाळी 11 वाजता सोमय्या पिता-पुत्रांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएनएस विक्रांत युद्धनौकेला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले. मात्र सोमय्यांनी हे पैसे राजभवनात जमाही केले नाहीत असा संजय राऊत यांचा आरोप आहे. 


नवी मुंबई, पुण्यात आयपीएलचे सामने



  • पहिली मॅच - चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदरबाद यांच्यात पहिला सामना दुपारी 3.30 वाजता

  • दुसरी मॅच - मुंबई इंडियन्स आणि रॉय चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता


आरोग्य मंत्रालयाकडून विश्व होमिओपॅथी दिवसानिमित्त दोन दिवसाचे  वैज्ञानिक संमेलन


आरोग्य मंत्रालयाकडून नवी दिल्लीत दोन दिवसीय वैज्ञानिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात हे संमेलन होणार आहे


अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचाराविरोधातील उपोषणाची सांगता 


आजच्या दिवशी दहावर्षापूर्वी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारातील उपोषणाची सांगता केली होती. अण्णा हजारेंनी 2011 साली दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण केले होते. हे उपोषण