Corona Vaccination : कोरोना महामारीने मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला पछाडून सोडलं आहे. पण आता हळूहळू या महामारीच्या संकाटातून जग बाहेर पडत असून यामध्ये लसीकरण ही एक महत्त्वाची बाब ठरत आहे. दरम्यान भारताची आर्थिक राजधानी मुंबई लसीकरणामध्ये पुढे असून संपूर्ण लसीकरणापासून मुंबईकर जवळपास 34 हजार डोसच दूर आहेत. हे डोस पूर्ण होताच मुंबईतील सर्व प्रौढ लसवंत होणार आहेत. मागील 15 महिन्यांपासून लसीकरणाची प्रक्रिया देशात सुरु झाली असून अशाप्रकारे 100% लसीकरण ही कामगिरी करणारं मेट्रो शहरातील मुंबई हे पहिलच शहर ठरणार आहे.
मुंबईत जवळपास 92.36 लाख इतकी प्रौढ लोकसंख्या आहे. ज्यातील 99.6% व्यक्तींनी शनिवारपर्यंत (26 मार्च) लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आठवडाभरात मुंबईतील 100 टक्के प्रौढ लोकसंख्या लसवंत होणार आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील 100% नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. ज्यानंतर आता लवकरच मुंबईतील 100 टक्के प्रौढ नागरिक लसीचा दुसरा डोस देखील घेऊन मुंबई 100% लसवंत होईल. ज्यामुळे मुंबई दिल्ली, चेन्नई अशा मोठ्या शहरांना लसीकरणाच्या शर्यतीत मागे टाकणार आहे.
लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेतून सावरलं - शशांक जोशी
कोव्हीड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी लसीकरणामुळेच मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून सावरलं असून यामुळे मुंबईकरांचं अधिक नुकसान झालं नसल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता. तसा झाला नसण्यामागचं कारण मोठ्या प्रमाणात झालेलं लसीकरण हेच आहे असंही जोशी म्हणाले
मुंबईत 268 सक्रिय कोरोनाबाधित
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार रविवारी मुंबईत 43 कोरोनाबाधित आढळले असून 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 268 इतकी झाली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 43 रुग्णांपैकी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 228 बेड्सपैकी केवळ 22 बेड सध्या वापरात आहेत.
हे ही वाचा -
- कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर आता पुन्हा पंतप्रधान मोदींचा फोटो येणार, सूत्रांची माहिती
- Amaranth Yatra : 30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, कोरोना नियम पाळणे बंधनकारक
- बापरे! कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 'या' राज्यातील सरकारने जमा केला 350 कोटी रुपयांचा दंड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha