Delhi : अंमली पदार्थ विरोधी सेलच्या (CAIFAN) पथकाने दिल्लीतील द्वारका जिल्ह्यातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आफ्रिकन ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. चिगोजी इबोह इजेले किंग असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. अटक करण्यात आलेला तस्कर नायजेरियाचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.


या बाबात माहिती देताना डीसीपी शंकर चौधरी  म्हणाले, ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी आमचे पथक सातत्याने माहिती मिळवत आहे. याच मोहिमेदरम्यान, अंमली पदार्थ विरोधी सेलच्या टीमला द्वारका परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी एक आफ्रिकन व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने एसीपी विजय सिंह यादव आणि एसआय सुभाष चंद यांच्या नेतृत्वाखाली एएसआय करतार सिंग, हेड कॉन्स्टेबल मोबीन, कॉन्स्टेबल रवी, प्रवीण आणि महिला कॉन्स्टेबल सोनू यांची टीम तयार केली. या पथकाने मेट्रो स्टेशनवर सापळा रचला. यावेळी पथकाने एका संशयित आफ्रिकनला पकडले. 


पोलिसांनी या अफ्रिकन तस्कराची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे एका पांढऱ्या पॉलिथिनमध्ये 76 ग्रॅम  अॅम्फेटामाइन आढळून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 76 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्याकडून या अंमली पदार्थासह एक स्कूटी आणि मोबाईल जप्त केला आहे.  


2014 मध्ये तीन महिन्यांच्या वैद्यकीय व्हिसावर हा तस्कर भारतात आला होता. तेव्हापासून तो मुंबईत भाड्याने राहत होता. गेल्या वर्षी तो दिल्लीला शिफ्ट झाला. उत्तम नगरमध्ये राहणाऱ्या जेम्स या आफ्रिकन व्यक्तीकडून त्याला अॅम्फेटामाइन ड्रग्ज मिळाल्याचे अटक केलेल्या आफ्रिकन ड्रग तस्कराने  चौकशीदरम्यान सांगितले. 


द्वारका उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये या आफ्रिकन तस्करावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या 10 दिवसांत तीन आफ्रिकन लोकांना ड्रग्ज तस्करी करताना पकडण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या


Hanuman Jayanti: दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक आणि तोडफोड; अनेक पोलिसही जखमी


Corona Update : चिंताजनक! दिल्लीत कोरोना रूग्णांमध्ये वाढ, 20 फेब्रुवारीनंतर सर्वात जास्त संख्या