जम्मू-काश्मीर : माछिल सेक्टरमध्ये ऑपरेशन दरम्यान तीन सैनिकांसह एक बीएसएफ जवान शहीद; तीन दहशतवादी ठार
बीएसएफच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन अजूनही सुरू आहे. BSF सोबत सैन्यही सहभागी आहे. या कारवाई दरम्यान कॉन्स्टेबल सुदीप सरकार शहीद झाले आहेत.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ऑपरेशन दरम्यान तीन सैनिक आणि एक बीएसएफ जवान शहीद झाला. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बीएसएफच्या म्हणण्यानुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार माछिल सेक्टरमध्ये कारवाई दरम्यान शहीद झाले. दहशतवाद्यांविरूद्धच्या कारवाईत सैन्यही सामील आहे. संयुक्त ऑपरेशन चालू आहे.
सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये सुरू असलेल्या कारवाईत लष्करातील एक कॅप्टन आणि दोन सैनिकांचा जीव गेला. तीन दहशतवादी ठार झाले आहेत. ऑपरेशन सुरु आहे.
#UPDATE Constable Sudip Sarkar lost his life during the operation in Machil Sector. Reinforcements received from Indian Army. Joint operation still underway: Border Security Force (BSF). #JammuAndKashmir https://t.co/M9rZTcaoaO
— ANI (@ANI) November 8, 2020
दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न
यापूर्वी, बीएसएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की 7 नोव्हेंबरला रात्री उशिरा, माछिल सेक्टरमधील एलओसीच्या कुंपणाजवळ गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांना अज्ञात व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. हे दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न रोखला. यात एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले. बाकीच्यांना माघार घ्यायला भाग पाडले. बीएसएफने दहशतवाद्यांकडून 1 एके -47 आणि 2 बॅग जप्त केल्या आहेत.