Jallikattu TamilNadu: तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू खेळादरम्यान उधाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात अनेकदा लोक जखमी होतात. मागच्या काही दिवसापूर्वीच जल्लीकट्टू खेळादरम्यान बैलाच्या हल्ल्यात तामिळनाडूनमध्ये एका 18 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तामिळनाडूच्या मदुराई याठिकाणी आयोजीत केलेल्या जल्लीकट्टू खेळादरम्यान अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाला आहे. जखमी पोलीस अधिकाऱ्याला मदुराई  तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


राज्यातील अनेक भागात जल्लीकट्टू स्पर्धेचं आयोजन केलं जातं. जल्लीकट्टू हा तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील एक पारंपारिक खेळ आहे. जो पोंगल सणाच्या वेळी आयोजित केला जातो, जिथे बैलांची माणसांशी लढाई केली जाते. मात्र, हा खेळ अनेकदा जीवघेणा ठरला आहे. प्रत्येक वर्षी या खेळाचे आयोजन केले आहे. यामध्ये अनेकजण जखमी होतात, तर काही जणांना स्वत: चा जीव देखील गमवावा लागतो. 


तमिळनाडूमध्ये बैलांच्या या धोकादायक खेळावरून बऱ्याचदा वाद झाला आहे. या खेळाच्या बंदीबाबत सातत्याने आवाज उठवला जात आहे. कारण जनावरांसोबतचा असा खेळ प्राणघातक आहे. तसेच त्या बैलांसाठीही धोकादायक आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. तो धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र या खेळाला केंद्राने हिरवा झेंडी दाखवला होती. बंदी असतानाही हा खेळ अखंड सुरूच होता. यावरून राजकारणही तापले होते. कारण जल्लीकट्टूचा संबंध राज्यातील जनतेशी आहे.


तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू खेळात अनेक लोक सक्रिय सहभागी होतात. यासाठी अनेक आकर्षक बक्षिसेही जाहीर केली जातात. जो खेळाडू सर्वाधिक बैल नियंत्रित करतो त्याला विजेता म्हणून घोषीत केले जाते. या खेळामध्ये अनेक बैलांना खुल्या मैदानात सोडले जाते, त्यानंतर खेळाडू त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. यावेळी संतप्त बैल खेळाडूंनाही जखमी करतात. तसेच अनेकवेळा बैल प्रेक्षकांमध्येसुद्धा जातात. या घटनामध्ये कित्येजणतरी जखमी होतात.


महत्त्वाच्या बातम्या: