चेन्नई: तामिळनाडूतील जलिकट्टूसाठी सुरु असलेलं आंदोलन आणखी तापायला सुरुवात झाली आहे. जलीकट्टू हा पारंपरिक खेळ कायमस्वरुपी करण्यासाठी राज्याच्या इतर भागातही आंदोलन सुरुच असून, आक्रमक आंदोलनकर्त्यांनी सिल्लूर आणि मदुराईतील ट्रेन थांबवल्या. शिवाय जलीकट्टूसाठीच्या आंदोलनात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले आहेत.


राज्यपालांनी जलिकट्टूला परवानगी देणाऱ्या अध्यादेशाला मंजूरी दिल्यानंतर राज्याच्या विविध भागात जलिकट्टूचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पुडुकोट्टाई जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात दोन जणांचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे जलिकट्टूच्या समर्थनार्थ आंदोलन करणारे 48 वर्षीय चंद्रमोहन यांची  शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाला.

दरम्यान, तामिळनाडूमधील अलंगनाल्लुर येथे जलिकट्टूच्या कार्यक्रमासाठी निघालेले मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांना विरोधाचा सामना करावा लागला. आंदोलनामुळे पन्नीरसेल्वम यांना जलिकट्टू कार्यक्रमाचे उद्घाटन न करताच माघारी फिरावे लागले.

तर दुसरीकडे रामेश्वरममध्येही श्रीलंकेतून आलेल्या निर्वासितांनी जलिकट्टूच्या समर्थनार्थ आंदोलन केलं आहे. पुडूपट्टी या गावात जलिकट्टूचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शंभरहून अधिक बैल जलिकट्टूत सहभागी झाले. या खेळात 500 ग्रामस्थांनी भाग घेतला होता.

संबंधित बातम्या

'जलिकट्टू'च्या अध्यादेशाला काही बदलांसह केंद्राची मंजुरी

जलीकट्टूसाठी रहमान, अश्विन, विश्वनाथन मैदानात

जलीकट्टूला विरोध असेल तर बिर्याणीवरही बंदी घाला: कमल हसन


जलीकट्टूवरील बंदीविरोधात चेन्नईच्या मरीना बीचवर जनक्षोभ


बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी चाकणमध्ये आंदोलन