एक्स्प्लोर
श्रीहरीकोटातून इस्रोच्या ‘नॉटी बॉय’ रॉकेट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा : श्रीहरीकोटातून इस्रोच्या ‘जीसॅट-9’चं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. हे रॉकेट सार्क देशांचा खास उपग्रह घेऊन अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं आहे. नॉटी बॉय नावानंही हे रॉकेट ओळखलं जातं.
जीसॅट-9 च्या निर्मितीसाठी 235 कोटींचा खर्च आला आहे. उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’च्या या कामगिरीचे कौतुक केलं.
https://twitter.com/ANI_news/status/860459937524207616
सार्क देशांसाठी उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. सार्क देशांतील आठपैकी सात सदस्य या प्रकल्पाचा भाग आहेत. पाकिस्तानने त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
भारताकडून आपल्याला कोणतीही ‘भेट’ घेण्याची इच्छा नाही, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. या उपग्रहामुळे दूरसंचार आणि प्रसारणाशी संबंधित सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनास सहकार्य शक्य होईल.
बातमीचा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement