ISRO कडून पाच वर्षात 19 देशांच्या 177 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण, 1100 कोटींची कमाई
ISRO Foreign Satellites Launched : गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 19 देशांच्या 177 परदेशी सॅटेलाईट लाँच केल्या आहेत. यातून इस्रोने 1100 कोटींची कमाई केली आहे.
ISRO Foreign Satellites Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) गेल्या काही वर्षांमध्ये अनेक परदेशी उपग्रहांचं (Foreign Satellites) यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या व्यावसायिक सॅटेलाईट लाँचमधून इस्त्रोने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. केंद्रीय केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री (Union Minister of State for Atomic Energy and Space) जितेंद्र सिंह (Dr. Jitendra Singh) यांनी संसदेत सांगितलं की, गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 19 देशांच्या 177 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण केलं आहे. या व्यावसायिक प्रक्षेपणातून इस्रोने 1100 कोटींची कमाई केली आहे. केंद्रीय मंत्री (Union Minister) जितेंद्र सिंह (Dr. Jitendra Singh) यांनी संसदेत गुरुवारी एका प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
5 वर्षात 19 देशांच्या 177 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण (ISRO Launched 177 Foreign Satellites)
इस्त्रोने जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक देशांच्या परदेशी उपग्रहांचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं आहे. व्यावयायिक प्रक्षेपण क्षेत्रात इस्त्रोचं हे मोठं पाऊल आहे. इस्त्रोने व्यावसायिक प्रक्षेपणाच्या साहाय्याने 19 देशांच्या 177 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या 19 देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश आहे.
इस्त्रोची सुमारे 1100 कोटींची कमाई
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रोने व्यावसायिक करार करत अनेक देशांच्य सॅटेलाईट लाँच केले. व्यावसायिक करारांतर्गत PSLV आणि जिओ सिंक्रोनस (GSLV-MKIII) सॅटेलाइट लाँच व्हेईकल, ज्याला आता LVM-3 म्हणून ओळखले जातं. या लाँचर्सच्या कमाईचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत माहिती देत सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने या व्यावसायिक उड्डाणांमधून सुमारे 1100 कोटी रुपये (94 दशलक्ष डॉलर आणि 46 दशलक्ष युरो) कमावले आहेत.
इस्त्रोची ऐतिहासिक कामगिरी
या वर्षाच्या सुरुवातीला इस्त्रोने LVM-3 च्या एका मोहिमेत 36 वनवेब उपग्रह (OneWeb satellites) लाँच केले होते. इतिहासात पहिल्यांदाच स्कायरुट एअरस्पेस या भारतीय कंपनीने 18 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक आणि खासगी रॉकेट लाँच केलं. या मोहिमेत रॉकेट विक्रम एसचं (Vikram S) यशस्वी प्रक्षेपण पार पडलं.