Terror Plan : नवीन वर्षात घुसखोरीचा पाकिस्तानचा नापाक कट उघड, कर्तारपूर कॉरिडोरमधून घुसखोरीचा कट
Pakistan Terror Plan : कर्तारपूर कॉरिडोरमार्गे पाच दहशतवाद्यांना भारतात पाठवून घातपाताचा कट रचण्यात आला आहे.
Kartarpur Corridor: नवीन वर्षात घुसखोरीचा पाकिस्तानचा कट उघड झाला आहे. श्रद्धेचं प्रतीक असणाऱ्या कर्तारपूर कॉरिडोरमार्गे भारतात घातपात घडवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे समोर आलेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना याबाबतचे महत्त्वाचे दस्ताऐवज हाती लागलेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना याबाबत निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे.
कर्तारपूर कॉरिडोरमार्गे पाच दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचे निर्देश आयएसआयने दिल्याचं समजतंय. या दहशतवाद्यांना दोन आठवड्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय. पंजाबच्या गुरुदासपूर आणि पठाणकोटमध्ये मोठ्या दहशतवादी कारवाईचे आयएसआयचे मनसुबे समोर आले आहे. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रात दोन आठवड्यांचे विशेष ट्रेनिंग देण्यात आले आहे. या प्रशिक्षणादरम्यान बॉम्बस्फोटापासून ते आत्मघातकी हल्ल्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्तारपूर कॉरिडोरमार्गे पाच दहशतवाद्यांना शिख वेशभूषेत भारतात घुसखोरी करण्यास सांगितले होते. तसेच दोन गटात दहशतवाद्यांना गुरदासपूर आणि जम्मू काश्मिरच्या पठाणकोटमध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले होते.
आगामी पंजाब विधानसभा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांच्या काळात घातपात घडवण्याचा पाकचा प्लॅन आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब आणि काश्मीरमधील यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी देशातील सर्व सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुखांशी बैठक घेतली होती. तसेच दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याच्या रणनीतीविषयी चर्चा करण्यात आली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या