भारत : भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीने (IRCTC) फेक मोबाईल अॅपबाबात (Mobile Fake App) सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रेल्वेच्या तिकीट (Railway Ticket) बुकिंगसाठी अनेक बनावट अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. या अॅप्समुळे नागरिकांची अनेकदा फसवूण होते. यातील कित्येक अॅप्स हे रेल्वेचे अधिकृत अॅप्स नसतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार दिवसागणिक वाढत असल्याचं रेल्वेच्या निदर्शनास आलं आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 


अॅपद्वारे बनावट लिंक पाठवण्याचे प्रमाण जास्त


या बनावट अॅपच्या माध्यमातून अनेक बनावट लिंक पाठवल्या जात आहेत. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलत तर तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना देखील करावा लागणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांकडून कधी अनावधाने या लिंकवर क्लिक केले जाते. पण बनावट  अॅप्स लिंक बनवणाऱ्यांचा यामुळे फायदा होता. त्यांच्या जाळ्यात निष्पाप नागरिक अडकतात. यामुळे अशा कोणत्याही प्रकारच्या लिंकवर नागरिकांनी त्यांची वयक्तिक माहिती देऊ नये असा सल्ला देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. 


IRCTC नेमका वापर कशासाठी?


IRCTC ही भारतीय रेल्वेचं  अॅप आहे. यामुळे नागरिकांना अगदी घरबसल्या रेल्वेचं तिकीट काढता येतं. यामुळे रेल्वे स्थानकावर जाऊन लांब रांगांमध्ये उभं राहून तिकीट काढण्यासाठी वेळ खर्ची करावा लागत नाही. तसेच या अॅपमुळे अगदी कमी वेळात हव्या त्या रेल्वेचं आणि हव्या त्या कोचचं तिकीट काढता येतं. मोबाईल फोनवर देखील या अॅपमुळे रेल्वेचं तिकीट काढणं सहज शक्य होतं. तसेच या  अॅपच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट देखील करता येते. त्यामुळे प्रवाशांना अगदी सोयीस्कररित्या रेल्वेचे तिकीट काढून प्रवास करता येतो. 


पण ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन होत असल्यामुळे यामधील फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. बऱ्याचदा IRCTC मूळ वेबसाईटवर काही वेळेस ताण आल्याने अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रेल्वेकडून यासाठी काही पर्यायी अॅप्स देखील तयार करण्यात आले आहेत. पण बऱ्याचदा काही फेक अॅप्सदेखील उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना नेमकं कोणतं अॅप खरं हा संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी IRCTC अधिकृत वेबसाईवरुनच तिकीट बुकिंग करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 


तिकीट बुकींग करताना कोणती काळजी घ्याल 


गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले अधिकृत आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांनी रेल्वेचे तिकीट बुकिंग करताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Non AC Vande Bharat Express : आता स्वस्तात मस्त प्रवास होणार! नॅान एसी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरु करणार