एक्स्प्लोर
रेल्वेच्या आलिशान सलून कारची सफर सर्वसामान्यांसाठी खुली
रेल्वे खात्याकडून प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या शाही सलून कोचचा प्रवास आता सर्वसामान्य प्रवाशांना अनुभवता येणार आहे. इतके दिवस हा कोच केवळ रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्री किंवा महत्त्वाच्या नेत्यांनाच या कोचचा वापर करता येत होता. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांनाही या शाही कोचचा अनुभव घेता येणार आहे.

मुंबई : रेल्वे खात्याकडून प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या शाही सलून कोचचा प्रवास आता सर्वसामान्य प्रवाशांना अनुभवता येणार आहे. इतके दिवस हा कोच केवळ रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्री किंवा महत्त्वाच्या नेत्यांनाच या कोचचा वापर करता येत होता. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांनाही या शाही कोचचा अनुभव घेता येणार आहे. आयआरसीटीसीकडून जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून कटरा स्टेशनपर्यंत या कोचचा वापर केला जाणार आहे. जम्मू मेल या ट्रेनला या शाही सलून कोचला जोडलं जाणार आहे. या कोचमध्ये 6 जणांना एकाचवेळी प्रवास करता येणार आहे. या कोचमध्ये दोन आलिशान वातानुकुलित बेडरुम असतील. तसंच बाथरुमही जोडलेलं असेल. तसंच एक मोठी लिव्हिंग कम डायनिंग रुमही असेल. या आलिशान सलून कोचचं भाडं जवळपास 2 लाख असेल. या कोचमध्ये प्रवाशांची काळजी घेण्यासाठी विशेष कर्मचारी वर्गही असेल. यात एक एसी एटेंडंट आणि एक सलून अटेंडंट प्रवाशांच्या दिमतीला हजर असतील. जुनी दिल्ली स्टेशनवरुन कटरासाठी निघालेला हा सलून कोच चार दिवसांची सफर प्रवाशांना घडवून परत दिल्लीत दाखल होईल. भारतीय रेल्वेकडे सर्व विभागांमध्ये एकूण 336 सलून कोच आहेत. यापैकी 62 कोच वातानुकुलित आहे. पाहा माझाचा स्पेशल रिपोर्ट :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
कोल्हापूर























