एक्स्प्लोर
Advertisement
जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफा अडवला जातो..
भोपाळः पंतप्रधान मोदी यांनी क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी ’70 साल आझादी, याद करो कुर्बानी’ कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी चंद्रशेखर आझाद यांच्या स्मारकाकडे जाताना मुस्लीम बहुल भागात मोदींचा ताफा अचानक अडवण्यात आला आणि 'मोदी-मोदी'च्या घोषणांचा नारा सुरु झाला.
मोदींच्या नाऱ्याने परिसर दुमदुमला होता. जमावाची गर्दी पाहता मोदींच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांनी जमावाला हटवण्याचे प्रयत्न केले. या घोषणांनी मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेचे कान चांगलेच टवकारले. मात्र जमावाला वेळीच हटवण्यात आलं.
मोदींनी देखील आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची इच्छा पूर्ण केली. ताफा थांबताच गाडीतून उतरुन लोकांची प्रत्यक्ष भेट घेतली. दरम्यान अचानक जमाव रस्त्यावर आल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement