एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जगभ्रमंती करुन सहा महिला नौदल अधिकारी गोव्यात दाखल
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी जगभ्रमंतीहून परत आलेल्या ‘आयएनएसव्ही तारिणी’तील सहा महिला नौदल अधिकाऱ्यांचं स्वागत केलं.
पणजी : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सहा महिला नौदल अधिकाऱ्यांसह जगभ्रमंतीला निघालेली ‘आयएनएसव्ही तारिणी’ ही शिडाची बोट गोव्यात परतली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा समुद्रकन्यांचं स्वागत केलं.
महिला अधिकाऱ्यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता.
आशियाई महिलांनी समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलीच वेळ होती. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सहा जणींनी तयारी केली होती.
दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचं बंदर होतं. त्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली. या प्रवासात महिला नौदल अधिकाऱ्यांनी 21 हजार 600 सागरी मैल अंतर पार केलं. जगभ्रमंती करताना अनेकवेळा त्यांच्या शिडाला वाईट हवामानाला तोंड द्यावं लागलं. सात मीटर उंची पर्यंतच्या लाटा आणि ताशी 60 किलोमीटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला.Smt @nsitharaman welcomes the crew of INSV Tarini along with Chief of the Naval Staff Admiral Sunil Lanba in Goa. #WelcomeHomeTarini pic.twitter.com/kYIpR9GgC4
— Raksha Mantri (@DefenceMinIndia) May 21, 2018
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आणि दक्षिण आफ्रिकेत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ही बोट 55 फूट लांबीची असून गोव्यातच अॅक्वारिस शिपयार्डमध्ये बांधण्यात आली होती. समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा या अधिकाऱ्यांनी अनुभव घेतला.#WelcomeHomeTarini Salute to skipper Lieutenant Commander Vartika Joshi and her crew - Lieutenant Commanders Pratibha Jamwal, Swati P and Lieutenants Aishwarya Boddapati, S Vijaya Devi and Payal Gupta on their return from expedition - Navika Sagar Parikrama on 21 May 2018. pic.twitter.com/0Qon0ODE4G
— Defence Spokesperson (@SpokespersonMoD) May 21, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
Advertisement