एक्स्प्लोर
Advertisement
काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवा, अोमर अब्दुल्लांची मागणी
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ल्याची भीतीही व्यक्त केली. तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
https://twitter.com/abdullah_omar/status/884462155436654592
याशिवाय अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणारे हे काश्मीरचे शत्रू असल्याची प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी दिली.
मेहबूबा मुफ्तींनी तातडीने बैठक बोलावली
अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज तातडीनं कॅबिनेटची मिटींग बोलवली आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 भाविक जखमी झाले आहेत. लष्कर ए तोयबाकडून झाल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या भाविकांची भेट घेऊन विचारपूस केली. या हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रा सुरू राहणार असल्याचे मुफ्ती यांनी सांगितलं.
तसंच या हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडून शिक्षा सुनावली जाईल, असंही त्या म्हणाल्या.
तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
संबंधित बातम्या
अमरनाथ हल्ला : देशभरात हाय अलर्ट, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 7 भाविकांचा मृत्यू
अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा नरेंद्र मोदींकडून निषेध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement