मुंबई :  गेल्या दोन-अडीच वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान (Coronavirus) घातले आहे. या कोरोना महामारीने शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून जभरातील संशोधक कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीजचा शोध घेत आहेत. या अँटीबॉडीज केवळ विषाणूच्या एका स्ट्रेनशीच नव्हे तर कोरोनाच्या सर्वच प्रकारांशीही लढू शकतो. दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) मधील शास्त्रज्ञांनी कोरोनाविरोधात लढणाऱ्या एका अँटीबॉडीचा शोध लावला आहे.  002-S21F2 असे या अँटीबॉडीजचे नाव आहे. 


इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीचे संजीव कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  “या अँटीबॉडीमध्ये SARS-CoV-2 प्रकारांच्या व्हेरियंटविरोधत लढा देतील. दिलासादाय बाब म्हणजे जगभरात सध्या कोरोना वाढत असताना हा शोध लागला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोनाच्या नव्या प्रकारात वाढ होणार असल्याचा  इशारा दिला आहे. कारण थंड हवामानामुळे बहुतेक संक्रमणांमागे ओमिक्रॉनसारखे व्हेरियंट सक्रिय होतात.  '


अल्फा, बीटा, गामा,  BA.1, BA.2 यांच्यासह ओमिक्रॉनच्या SARS-CoV-2 प्रकारांविरूद्ध अँटीबॉडीची चाचणी केली गेली आहे. या चाचणीमध्ये हे सिद्ध झाले आहे की,  002-S2-1F2 अँटीबॉडीज सर्व सर्व व्हेरियंटविरोधात सक्षम प्रमाणे लढण्यास सक्षण आहेत.  संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अॅंटीबॉडीच कोरोनाच्या सर्व प्रकारांना पूर्णपणे नष्ट करू शकत नसले तरी त्यांना पुढे वाढ तरी देत नाहीत.   


जगभरात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असली तरी भारतात मात्र नव्या रूग्ण संख्येत घट होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. परंतु, बिटनमध्ये मात्र कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चीनमध्ये  देखील कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. 


'मोनोक्लोनल' अँटीबॉडी म्हणजे काय?


व्हेरियांशी लढणारे मोनोक्लोनल ऍन्टीबॉडीज या विशिष्ट पेशींच्या पृष्ठभागाच्या संरचनांना लक्ष्य करतात आणि संक्रमित पेशी नष्ट करतात. यासह व्हेरियंट रक्तप्रवाहातून विषाणू काढून टाकतात त्यांना "मोनोक्लोनल" अँटीबॉडीज म्हणतात.  दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) मधील शास्त्रज्ञांनी  कोरोनाची सौम्य लक्षणे  असणाऱ्या रूग्णांवर या हे संशोधन केले आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या या रूग्णाच्या अॅंटीबॉडीच या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगली मदत करतात.  जगभरातील कंपन्या आता कोरोनासाठी थेरपी किंवा लस तयार करण्यासाठी 002-S21F2 वापरू शकतात, असे संशोधकांनी सांगितले.  


महत्वाच्या बातम्या


वेल डन इंडिया! कोरोना काळात गरीब देशांना मदतीचा हात, जागतिक बँकेकडून कौतुक 


Mumbai : कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून ट्विटरचा प्रभावी वापर, 'असा' केला आव्हानांचा सामना