world bank on india covid :  कोरोना महामारीमधील कामामुळे जागतिक स्तरावर भारताचं कौतुक होत आहे. वर्ल्ड बँकेचे (World Bank) अध्यक्ष डेविड मालपास यांनी भारताचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात गरीब देशांसाठी भारताचं काम कौतुकास्पद आहे. महामारीच्या भयावह संकटामध्ये भारताने गरीब आणि गरजू लोकांसाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे. यासोबतच मालपास यांनी भारताने दिलेल्या रख हस्तांतरणावरही भाष्य केले. इतर देशांनी मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली. पण भारताने रोख हस्तांतरणावर लक्ष केंद्रित केलं. 


कोरोना काळात गरिबीचं प्रमाण वाढलं -
डेविड मालपास म्हणाले की, 'कोरोना काळात सर्वात मोठी किंमत गरीब लोकांना चुकवावी लागली. कोरोनामुळे गरीब देशातील गरिबी अधिक वाढली. त्यासोबतच अशा अर्थव्यस्था समोर आल्या ज्या अधिक अनौपचारिक आहेत. तसेच अनेक सामाजिक सुरक्षा कमकुवत असल्याचेही समोर आले. त्यासोबतच कमकुवत अर्थव्यवस्था समोर आल्या. इतकं असतानाही, अनेक विकसनशील अर्थव्यवस्थाने कोरोना काळात उल्लेखनीय काम केलं.'  
 
डिजिटल व्यवहाराचा फायदा झाला - 


वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेविड मालपास म्हणाले की, कोरोन काळात भारताने आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरुपात केले. भारताने ग्रामीण भागात 85 टक्के परिवारांना तर शहरी भागात 69 टक्के कुटुंबांना अन्न-धान्य आणि पैसे पुरवले. हे खरचं कौतुकास्पद आहे. 


कोरोना काळात दक्षिण आफ्रिकानं सामाजिक सुरक्षामध्ये मोठा विस्तार केला आणि गरिबीवर मात करण्यासाठी 6 अरब डॉलर खर्च केले. याचा तब्बल 2.9 कोटी लोकांना फायदा मिळाला, असे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेविव मालपास म्हणाले. 


ब्राजीलने अर्थव्यवस्था ढासळल्यानंतरही 2020 मध्ये गरिबी कमी करण्यात यश मिळावलं. प्रत्येक कुटुंबासाठी डिजिटिल कॅश ट्रान्सफर केल्यामुळे ब्राजीलला हे यश मिळाल्याचं मालपास यांनी सांगितलं.  


सबसिडीऐवजी कॅश ट्रान्सफर निवडण्याचा सल्ला -   
मालपास म्हणाले, सबसिडी देण्याऐवजी टार्गेटेड कॅश ट्रान्सफरला निवडावं. यामुळे गरीब आणि संवेदनशील लोकांना फायदा मिळू शकतो. कॅश ट्रान्सफरमुळे 60 टक्केंपेक्षा अधिक खर्च मध्यम वर्गातील 40 टक्के लोकांपर्यंत पोहचतो. सबसिडीऐवजी कॅश ट्रान्सफरचा उत्पन्न वाढीवर प्रभाव पडतो. 


दरम्यान, 2019 मध्ये कोरोना महामारीनं जगभरात धुमाकूळ घातला होता. अनेकांचा यामध्ये मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला. अनेकजण अनाथ झाले. जगभरात लॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यामुळे सर्वसामान्य, गरीब, मजूरांना रोजगार मिळत नव्हता. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थिती भारत सरकारने गरजू आणि गरिबांसाठी देशभरात मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला. काही लोकांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यात आले होते. कोरोना लसीचे मोफत डोस देण्यात आले. शेजारील देशांनाही भारताने कोरोना काळात मदतीचा हात दिला होता.