(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : भारत हे राष्ट्र नसून..', राहुल गांधींच्या वक्तव्यावरून एका अधिकाऱ्याने शिकवला राष्ट्रवादाचा धडा, Video Viral
Rahul Gandhi At Cambridge : केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींना एका भारतीय अधिकाऱ्याने राष्ट्र, भारत आणि चाणक्यांच्या राष्ट्रवादाचा धडा शिकवला. याचा व्हिडिओ स्वतः अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
Rahul Gandhi At Cambridge : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लंडनमध्ये मुक्कामावर असून, तिथल्या अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. या दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या देशात खळबळ उडाली आहे. केंब्रिज विद्यापीठात त्यांच्या भाषणादरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याने त्यांना राष्ट्र, भारत आणि चाणक्यांच्या राष्ट्रवादाचा धडा शिकवला. याचा व्हिडिओ स्वतः अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
अधिकाऱ्याने राहुल गांधीना शिकवला राष्ट्रवादाचा धडा
लंडन दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी सर्वप्रथम 'आयडियाज फॉर इंडिया' परिषदेला हजेरी लावली. यानंतर सोमवारी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी जे व्हिजन बनवत आहेत ते सर्वसमावेशक नाही, त्यांची दृष्टी देशाच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागाला वगळते. हे अन्यायकारक आणि भारताच्या कल्पनेच्या विरोधात आहे. कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये 'इंडिया अॅक्ट 75' या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हिंदू राष्ट्रवाद, काँग्रेस पक्षातील गांधी कुटुंबाची भूमिका आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांसह देशातील लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली.
Yesterday, in Cambridge, I questioned Mr. Rahul Gandhi on his statement that "India is not a nation but a Union of States". He asserted that India is not a nation but the result of negotiation between states. (His complete response will be shared once uploaded by organisers) pic.twitter.com/q5KluwenMf
— Siddhartha Verma (@Sid_IRTS) May 24, 2022
सिद्धार्थ वर्मा, केंब्रिजचे संशोधन अभ्यासक,
भारतीय नागरी सेवा अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांनी व्हिडिओ शेअर केला आणि केंब्रिज कार्यक्रमादरम्यान त्यांनी राहुल गांधींच्या विचारांना कसे योग्य उत्तर दिले ते सांगितले. वर्मा हे भारतीय रेल्वेचे वाहतूक सेवा अधिकारी आहेत आणि सध्या केंब्रिज विद्यापीठात 'पब्लिक पोलिस' या विषयावर कॉमनवेल्थ रिसर्च फेलो आहेत.
राहुल आणि वर्मा यांच्यातील संवाद
राहुल गांधी : चाणक्याने आपल्या विद्यार्थ्यांना भारताची कल्पना सांगताना 'राष्ट्र' हा शब्द वापरला होता का?
वर्मा : होय, चाणक्याने राष्ट्र हा शब्द वापरला आहे. भारताच्या वैशिष्ट्याचे वर्णन करण्यासाठी हा संस्कृत शब्द आहे
राहुल : राष्ट्र म्हणजे 'किंगडम' (साम्राज्य), राष्ट्र नव्हे. राष्ट्र हा शब्द पाश्चिमात्य संकल्पना आहे. त्याचबरोबर राहुल गांधींनी स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्र-राज्य ही संकल्पना पश्चिमेतून निर्माण झाली आणि भारत हे राज्यांचे महासंघ असल्याचे सांगितले.
वर्मा : जेव्हा मी राष्ट्राबद्दल बोलतो, तेव्हा मी एकट्या राजकीय संस्थेबद्दल बोलत नाही. जगभरात हे प्रयोग झाले आहेत. तेथे सोव्हिएत युनियन होते, युगोस्लाव्हिया होते, संयुक्त अरब प्रजासत्ताक होते. जोपर्यंत राष्ट्राला सामाजिक-सांस्कृतिक आणि भावनिक जोड आणि मिश्र संस्कृती नसेल, तोपर्यंत राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. संविधान राष्ट्र घडवू शकत नाही, राष्ट्रच संविधान बनवू शकते. एक राजकारणी म्हणून तुम्हाला वाटत नाही की भारताबद्दलची तुमची कल्पना केवळ सदोष आणि चुकीची नाही तर विनाशकारी देखील आहे, कारण ती हजारो वर्षांचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न करतेय.