एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक पार्ट-2'चं कृष्णा खोऱ्याशी कनेक्शन?

नवी दिल्ली : घुसखोरांना मदत करण्याऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्य दलाने 9 मे रोजी चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्याने नौशेरामधील पाकिस्ताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. याबाबतची माहिती काल भारतील सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत दिली. सैन्याने नौशेरामधील कारवाईचा व्हिडीओदेखील जारी केला आहे. पण आता या घटनेचा पूंछमधील कृष्णा खोऱ्यातील भारतीय सैनिकांच्या मृतदेहाच्या विटंबनेशी जोडला जात आहे. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय सैनिकांच्या मृतदेहाच्या विटंबनेचा वचपा काढल्याची चर्चा आहे. कारण 1 मे रोजी पूंछमधील कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन फोर्सने दोन भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. त्याचा राग भारतीय सैन्यासोबत सर्वच भारतीयांमध्ये होता. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी भावना कोट्यवधी भारतीयांनी व्यक्त केली होती. त्यानुसार भारतीय सैन्य दलाने 9 मे रोजी नौशेरामधील पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, भारतीय सैन्याने नौशेरामधील ज्या भागात सर्जिक स्ट्राईकचा पार्ट-2 केला. त्याच भागात 28 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्याने पहिले सर्जिक स्ट्राईक केले होते. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानने बळकावलेल्या हद्दीतील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. याच भागातून पुन्हा घुसखोरी होत असताना, भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 1 मे रोजी पूंछमधील कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन फोर्सने भारतीय सीमेत घुसखोरी करुन नायाब सुबेदार परमजीत सिंह आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर या दोन भारतीय जवानांची हत्या केली होती. तसेच त्यांचे शिर कापून नेलं होतं. कृष्णा खोऱ्यातील या घटनेचा भारतीय सैन्याने आठ दिवसातच वचपा काढला आहे. काल भारतीय सैन्याने जारी केलेल्या व्हिडीओत, 9 मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाक सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. रॉकेट लॉन्चर, अँटी टँक गायडेड मिसाईल, 106 रिकॉल गन आणि ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चरच्या सहाय्याने भारतीय सैन्याने ही कारवाई केली. नौशेरा भागातील पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरमध्ये पाक रेंजर्सनी बंकर उभारले आहेत. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास मदत व्हावी, यासाठी या बंकरमधून पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग केलं जातं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 17 एप्रिल रोजी नौशेराच्या याच पोस्टवरुन शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार झाला होता. संबंधित बातम्या घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या दाव्याचा इन्कार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget